या पोरीने पोपटाला ड्रॅगनसारखे काय शिकवून ठेवलंय पाहा !!

गेम ऑफ थ्रोन्स मालिकेतल्या ‘डेनेरीस टार्गेरीयन’कडे ३ ड्रॅगन्स आहेत. तिने फक्त ‘Dracarys’ हा शब्द उच्चारला की हे ड्रॅगन्स आग ओकतात. हे झालं काल्पनिक जगातलं. आज आम्ही तुमच्याशी खऱ्याखुऱ्या जगातल्या डेनेरीसची भेट घालून देणार आहोत.

एका ट्विटर युझारने त्याच्या पुतणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची ही पुतणी भलतीच हुशार आहे राव. तिने आपल्या पोपटाला खास ट्रेनिंग देऊन ठेवलं आहे. ती ज्या व्यक्तीकडे बघून किंचाळते त्याच्यावर हा पोपट तुटून पडतो. हे या व्हिडीओ मध्येच पाहा.

राव, गेम ऑफ थ्रोन्सचं वारं सध्या वेगाने वाहत आहे म्हटल्यावर हा व्हिडीओ व्हायरल होणार नाय तर काय. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १ कोटी ८० लाख पेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे. शेअर आणि कमेंट्सचा तर नुसता पाऊस पडतोय राव.

मंडळी, पोपटाचा असा हटके वापर फक्त या पोरीने केलेला नाही बरं का, ब्राझील मधल्या ड्रग डीलर्सनी पण या पक्षाचा असाच वापर केला होता. खालील लिंक वर पूर्ण बातमी वाचा !!

सबस्क्राईब करा

* indicates required