ब्रिटनची राणी शोधत आहे सोशल मिडिया मॅनेजर.... मिळणार तब्बल एवढं मोठं मानधन !!

मंडळी, जॉब शोधताय का ? मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ब्रिटनची राणी सध्या सोशल मिडिया मॅनेजरच्या शोधात आहे. या पदासाठी राणी जो भरगच्च पैसा देणार आहे ते पाहून तुम्ही उड्याच माराल.
थांबा !! फार उत्साहित होऊ नका आधी पूर्ण बातमी वाचा !!
प्रत्येक सेलिब्रिटी आपली सोशल मिडीयावरची इमेज जपत असतो. ब्रिटनच्या राणीला पण आपली इमेज जपायची आहे. त्यासाठी तिच्या वतीने सोशल मिडिया सांभाळणारी व्यक्ती हवी आहे. हे काम अत्यंत महत्वाचं आहे. जी व्यक्ती हे काम करेल तिचं काम संपूर्ण जग बघणार आहे. एवढंच नाही तर संपूर्ण जगात त्या व्यक्तीची ख्याती पोहोचेल. कामासाठी पैसे पण तेवढेच आहेत. तब्बल ३०,००० पाऊंड म्हणजे २६.६ लाख रुपये राव.
कामाचं स्वरूप काय असेल ?

आता कामाचं बोलूया !!! तुम्हाला जर सोशल मिडिया मॅनेजर काय काम करतो हे माहित असेल तर तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण माहित नसेल तर टेन्शन नॉट. पुढील मुद्दे वाचा.
(राणीसाठी सोशल मिडिया मॅनेजरच्या कामात बदल करण्यात आले आहेत.)
१. सोशल मिडीयावर राणीची उपस्थिती सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधून काढणे.
२. सोशल नेटवर्कवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर नजर ठेवणे आणि त्या योग्यरीतीने प्रसारित करणे.
३. कंटेंट तयार करणे. राणीसाठीची एक नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटसाठी योग्य संशोधन करून लेख तयार करणे.
४. राणी ज्या ज्या समारंभांना उपस्थित असते तिथल्या बातम्या प्रसारित करणे आणि लोक गुंतून राहतील हे पाहणे.
५. नवनवीन तंत्रज्ञान आणि विश्लेषणातून राणीचं डिजिटल कम्युनिकेशन वाढवणे
शिक्षणाची अट काय आहे ?
१. डिग्री पर्यंतचं शिक्षण आणि वेबसाईट सांभाळण्याचा अनुभव.
२. सोशल मिडिया कंटेंट तयार करण्याचा अनुभव.
३. सध्याच्या घडीला डिजिटल कम्युनिकेशन मध्ये काय चाललं आहे याची इत्यंभूत माहिती असावी.
४. गडी क्रियेटीव्ह असला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेंट तयार करता आला पाहिजे. त्या व्यक्तीने कामाच्या बाबतीत चोख असलं पाहिजे.
५. काम करण्यात नियोजन कैशल्य हवं. वेळेवर काम होण्यासाठी योग्य तशी पूर्वतयारी करण्याचं कसब असावं.
६. राणीला फॉलो करणाऱ्या माणसांची मानसिकता ओळखून त्या प्रमाणे काम करण्याचं कसब असावं.
अर्ज कसा करायचा ?
सोप्पंय राव !! खालील वेबसाईटवर जा आणि माहिती वाचून अर्ज भरा !!
मंडळी, ब्रिटनच्या राणीने या वर्षी मार्च महिन्यात सोशल मिडीयावर पदार्पण केलं. पण ब्रिटनच्या शाही परिवारातील इतर लोक फार पूर्वीपासून सोशल मिडीयावर आहेत. त्यांना लाखो लोक फॉलो करतात.
काही दिवसापूर्वी शाही परिवारातील मेगन मार्कल आणि केट मिडलटन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. असे ट्रोल्स रोखण्यासाठी राजघराण्याकडून एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रकरणाबद्दल आणखी वाचण्यासाठी खालील लिंक वर जा !!
ट्रोलिंग करणाऱ्यांच्या विरोधात इंग्लंडच्या राजघराण्याने काढलाय जाहीरनामा...काय आहेत याची कलमं??
तर मंडळी, कोण कोण अप्लाय करणार आहे या जॉबसाठी ??