100 रथांची वालुचित्रे काढून पटनाईकांनी रचला रेकॉर्ड !!!
सुदर्शन पटनाईकांची वाळू शिल्पे प्रसिद्ध आहेत. सामाजिक विषयांना वाहिलेली त्यांची शिल्पे नेहमीच त्या-त्या विषयांवर भाष्य करतात.

आज चालू झालेल्या पुरी यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम केलाय. त्यांनी 100 रथांची वाळूशिल्पे पुरीच्या किनाऱ्यावर बनवली आहेत.
ही शिल्पे बनवायला त्यांना 300 पोती वाळू लागली.

या कामात त्यांना त्यांच्या 25 विद्यार्थ्यांची मदत झाली.

पद्मश्री सुदर्शन पटनाईक यांनी आजवर 50हून अधिक जागतिक स्पर्धांमधून आपला ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या रथयात्रेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्याची शक्यता आहे





