computer

जपानच्या झुमधले सिंह असे विचित्र चेहरे करून का बसलेत?? व्हिडिओ पाहून घ्या!!

मंडळी बऱ्याचदा म्हटले जाते कि प्राण्यांना पण भावना असते आणि बिचारे प्राणी वेळोवेळी हे  दाखवूनही देत असतात राव!! कधी माणसांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून,  तर कधी अगदी माणसांसारखे वागून!! त्यांना जर चांगला सहवास मिळाला तर ते माणसांसारखे वागतात. अशीच एक घटना घडली आहे राव!! त्या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान वायरल होत आहे. काय आहे तो विडिओ आणि काय आहे संपूर्ण प्रकरण चला बघूया...

जपानमधल्या एका प्राणी संग्रहालयात काही दिवसांपूर्वी एखादा सिंह प्राणीसंग्रहालयातुन पळून जात असेल तर त्यासाठी काय करावे यावर प्रशिक्षण देण्यात येत होते. पण मंडळी या कामासाठी खरा सिंह वापरला तर प्रॉब्लेम होऊ शकला असता. त्याला शिकवण्याच्या नादात तोच पळून गेला तर? मग तिथल्या अधिकाऱ्यांनी एक भारी आयडीया शोधून काढली. त्यांनी चक्क एका माणसालाच सिंहाचे कपडे घातले आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना त्या नकली सिंहासोबत ट्रेनिंग घ्यायला सांगितले. पण मंडळी, या नंतरची गोष्ट खरी रंजक आहे. नंतर असे काही झाले कि तो विडिओ चांगलाच वायरल झाला. प्राणी संग्रहालयाच्या आवारात सिंहासारखा पोशाख करून फिरणाऱ्या माणसाच्या व्हिडिओला चक्क ४३ लाख व्ह्यूज मिळाले राव!! हा पाहा तो व्हिडीओ !!

खरी प्रतिक्रिया दिली ती प्राणी संग्रहालयातल्या खऱ्या सिंहांनी. ही सगळी धावपळ ते एके ठिकाणी बसून शांतपणे बघत होते आणि ही सगळी पळापळ बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे कॅमेऱ्यात आले राव!! त्यांच्या चेहऱ्यावरून सुरुवातीला हे काय नवीन नाटक चालू आहे संग्रहालयात असे त्यांना वाटत असावे असेच दिसत होते. पण जसजसा त्या नकली सिंहाचा खेळ वाढत गेला तसतशी खऱ्या सिहांच्या चेहऱ्यावर मात्र विचित्र प्रतिक्रिया उमटली.

मंडळी,  हा व्हिडिओ वायरल झाल्यावर मात्र लोक आपले हसू आवरू शकत नव्हते. हा व्हिडिओ एका दिवसात तुफान वायरल झाला. फक्त ट्विटरवर या व्हिडिओला ८२ हजार लाईक्स मिळाले. असा व्हिडिओ वायरल झाला आणि त्यावर मिम्स तयार नाही झाले असे कसे व्हायचे? तर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी ते सिंह काय विचार करत असतील यावर एकाहून एक भन्नाट मिम्स तयार केले. काहींनी असेच इतर प्राणीसंग्रहालयात आलेले त्यांचे अनुभव शेअर केले. एकंदरीत सिंह संग्रहालय सोडून पळाला तर काय करायचे याचे प्रशिक्षण देण्याच्या नादात तिथल्या अधिकाऱ्यांनी नकली सिंह तर बनवला, पण त्यांचे स्वतःचे हसू करून घेतले राव!!

मंडळी, तुम्हांला हा व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमचे पण असेच काही भन्नाट अनुभव असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required