फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप डाऊन का झालेत ? हे आहे त्यामागचं कारण !!

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप वापरताना अडचण येत आहे का ? फोटो पाठवता येत नाहीये, आलेले फोटो पाहता येत नाहीयेत. असं जर तुमच्या सोबत होत असेल तर तुमच्या नेटवर्कला दोष देऊ नका किंवा मोबाईल खराब झालाय असंही समजू नका. खरं तर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप हे तिन्ही एकाचवेळी ठप्प पडले आहेत. काय आहे या मागचं कारण ? चला जाणून घेऊया.
मंडळी, अमेरिका, युरोप आणि भारत अशा तीन मुख्य ठिकाणी हे घडलं होतं. काल संध्याकाळपासून लोकांना आणि व्हिडीओ अपलोड करता येत नव्हते. लोकांनी याबद्दल तक्रार केली. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप हे फेसबुकच्याच मालकीचं असल्याने फेसबुकने लगेचच याकडे लक्ष दिलं. आज सकाळी ही समस्या सोडवण्यात यश आलं आहे.
फेसबुकने दिलेल्या प्रक्रियेत “डाऊन” मागचं कारण सांगण्यात आलं. नियमित केल्या जाणाऱ्या मेंटेनन्सच्या कामामुळे ही समस्या उद्भवली होती. फेसबुककडून तिन्ही माध्यमे सुरळीत चालवीत यासाठी काळजी घेतली जाते. अशाच एका मेंटेनन्स ऑपरेशन दरम्यान फेसबुककडून एक त्रुटी निर्माण झाली. ज्या कारणाने युझर्सना फोटो आणि व्हिडीओ अपलोड आणि डाऊनलोड करताना अडचण येत होती.
मंडळी, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. यावर्षी मार्च महिन्यात पण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप हे तिन्ही एकाचवेळी बंद पडले होते. पण कालचा दिवसच वेगळा होता. ट्विटर सुद्धा डाऊन झालं होत.