सर्वाधिक खेळला जाणारा मल्टिप्लेयर गेम “काउंटर स्ट्राईक”आता अँड्रॉइडवर

ज्या व्यक्तीने कंप्यूटर गेम्स खेळले आहेत तिने काऊंटर स्ट्राईक खेळला नाही असे शक्य नाही. निदान या गेम चे नाव तरी ऐकलेले असतेच. तर खूप पॉप्युलर असणारा हा गेम आता अँड्रॉइड मोबाईल वरसुद्धा उपलब्ध झाला आहे. अलिबेक ओमेराव नावाच्या एका प्रोग्रॅमरने या गेमचे अँड्रॉइड व्हर्जन तयार केलं आहे.

काउंटर स्ट्राईकचे सध्याचे व्हर्जन ग्लोबल ऑफेन्सिव्ह नावाने ओळखले जाते तर अँड्राईडवर जुने म्हणजेच काउंटर स्ट्राईक 1.6 उपलब्ध केलं आहे. हे तुमच्या फोनवर टाकण्याकरिता तुम्हाला या गेम च्या  APK फाइल शिवाय Xash3D नावाचे साँफ्टवेअर लागेल. या सर्व फाईल्स या लिंकवर उपलब्ध आहेत.

अलिबेकने या गेमप्लेचा व्हिडिओ टाकला आहे आणि हो, मोबाईलमध्ये हा गेम बराच चांगला चालताना दिसतो.

 

सबस्क्राईब करा

* indicates required