भंगार फ्रीजची अशी विल्हेवाट लावल्यावर स्पेनच्या पोलिसांनी काय केलं पाहा..

मंडळी, आपले येडे चाळे आपल्याच अंगाशी कसे येतात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गोष्ट आहे स्पेनची. एका माणसाने घरातला जुना फ्रीज काढून टाकण्यासाठी त्याला चक्क एका डोंगरकड्यावरून फेकून दिलं. या प्रसंगाचा त्याने व्हिडीओ पण बनवला. व्हिडीओ मध्ये तो फ्रीज खाली फेकताना ‘चला रिसायकल करूया’ म्हणतोय. हा पाहा तो व्हिडीओ.
हा व्हिडीओ काही दिवसातच व्हायरल झाला. आता हे भारतात घडलं असतं तर कोणी काही म्हटलं नसतं, पण हे स्पेन आहे भाऊ. स्पेनच्या पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच त्या माणसाला शोधून काढलं आणि फ्रीज पुन्हा वरती आणायची शिक्षा दिली.
मंडळी, ही शिक्षा तर काहीच नाही. गार्डियन न्यूजने दिलेल्या बातमीनुसार त्याला ४५,००० युरोचा दंड ठोठावण्यात आलाय. भारतीय चलनाप्रमाणे तब्बल ३५,७५,२५० रुपये.
तर मंडळी, असे कडक कायदे आपल्या इकडे पण झाले पाहिजेत, नाही का ? तुम्हाला काय वाटतं ?