'पब्जी'चा फूलफॉर्म विचारल्यावर लाईफलाईन वापरणारा दुर्मिळ मनुष्यप्राणी !!

पब्जीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याचा सर्वात लोकप्रिय गेम असलेल्या पब्जीची चर्चा तेवढाच लोकप्रिय शो कोन बनेगा करोडपतीवर पण झाली राव!! अमिताभ बच्चनने एका कटेंस्टंटला चक्क पब्जीवर प्रश्न विचारला.
विवेक भगत अशा त्या कंटेस्टंटचे नाव आहे. त्याला पब्जीचा फुलफॉर्म विचारण्यात आला. गंमत म्हणजे त्याला त्याचे उत्तर देता आले नाही. मग त्याने ऑडियन्स पोल घ्यायचे ठरवले आणि ऑडियन्सने बरोबर उत्तर दिल्यावर विवेकची या प्रश्नापासून सुटका झाली.
गेल्या काही दिवसांपासून कोन बनेगा करोडपती पुन्हा सुरु झाले आहे. आतापर्यंत तीन कंटेस्टंट येऊन गेले आहेत. पण अजूनही कुणी म्हणावी तशी कमाई केली नाही राव!! विवेक भगतला पण दहा हजार जिंकून समाधान मानावे लागले.
मंडळी, यानंतर प्रचंड मीम्स वायरल होत आहेत. काही लोक तर असेही म्हणत आहेत की जर उद्या तुमच्या घरच्यांनी तुम्हाला पब्जी खेळू दिले नाही तर त्यांना हा एपिसोड दाखवा. तर काहींना पूर्ण एपिसोडमध्ये या एकाच प्रश्नाचे उत्तर माहित होते.
पण मंडळी, त्या बिचाऱ्याला पब्जीबद्दल माहित नसेल. त्याला एवढ्याशा प्रश्नासाठी त्याची एक लाइफलाइन गमवावी लागली.
कौन बनेगा करोडपती आणि पब्जी दोन्हीबद्दल सांगण्याची गरज नाहिये राव!! अभ्यासू लोक कोन बनेगा करोडपती बघतात तर रिकामटेकडे लोक पब्जी खेळतात. पण पब्जीवर प्रश्न विचारल्यावर हेच रिकामटेकडे लोक फॉर्ममध्ये आले आहेत.
ज्यांना अजूनही पब्जीचा फुलफॉर्म माहित नाही त्यांच्यासाठी पब्जीचा फुलफोर्म आहे- प्लेयर अननोन बॅटलग्राऊंड...
लेखक : वैभव पाटील.
आणखी वाचा :
पब्जी भारतात बनला असता तर, या माणसाने केलेले चित्रण परफेक्ट आहे