कोल्हापुरात पावसाचे थैमान, घाटातून वाहताहेत धबधबे

Subscribe to Bobhata

गेले दोन दिवस कोल्हापुरात पाऊस वाढल्याच्या आणि पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. सांगलीच्या आयर्विन पुलावरचे धोक्याची पातळी आणि पाण्याची वाढती पातळी दाखवणारे फोटोही व्हॉटसऍपवरून मोबाईलवर येऊन धडकत आहेत. हा असाच एक व्हिडिओ बोभाटा.कॉमच्या हाती आज आलाय.

व्हिडिओ आहे कोल्हापूर जवळच्या गगनबावडा इथला. दुपारच्या पावसाने इतके मोठाले धबधबे तयार झाले आहेत की वाहने चालवणं मुश्किल व्हावं. हे धबधबे तयार झालेयत नेमके घाटात. पाण्याच्या इतक्या जोरदार लोटांमुळे अपघातांची शक्यताही वाढते. त्यामुळे कोल्हापूर-बावडा निवासींनो सावधान. गरज असेल तरच या रस्त्याने प्रवास करा. नाहीतर निवांत घरी गरमागरम चहाचे घुटके घेत पावसाचा आनंद लुटा..

सबस्क्राईब करा

* indicates required