रजनीकांतच्या कबालीसाठी कंपनीने चक्क सुटी जाहीर केली?

साऊथ इंडियन लोकांचं सिनेमाप्रेम जगजाहिर आहे. ते नट-नट्यांची मंदिरे बांधतात, त्यांच्या म्हातार्‍या-कोतार्‍या नटांना म्हातारे म्हटलं की समस्त दक्षिणी बांधवांना राग येतो वगैरे प्रकार आता जुने झाले. रजनीकांत म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मग त्याचा आता नवीन सिनेमा येतोय म्हटल्यावर इतक्या लोकांनी रजा घेतल्या की एका कंपनीने येत्या शुक्रवारी चक्क ऑफिशियल  सुटीच जाहिर केली. 

फाईंडस नावाच्या कंपनीच्या नावाचे हे पत्र फेसबुकवर आज फिरत आहे. कंपनी आहे मूळची चेन्नईची,  आणि  या कंपनीचं फेसबुक पेज पाह्यलं तर ते रजनीकांतच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यामुळे ही सुटी पण प्रमोशन किंवा सेलिब्रेशनचा भाग असावी अशी शक्यताही दिसून येतेय. 

सबस्क्राईब करा

* indicates required