चक्क चोरांनीच सांगितल्या आहेत घर चोरांपासून सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स !
‘रेडीट’वर रोजच वेगवेगळ्या चर्चा घडत असतात आणि लोक नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी AsleepFondant नावाच्या व्यक्तीने थेट निवृत्त चोरांनाच प्रश्न विचारला ‘घर चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं?’.
असा प्रश्न विचारल्यावर तिथे खरोखर चोरांची फौज आली आणि त्यांनी काही टिप्स सुद्धा दिले. १३,००० पेक्षा जास्त लोकांनी या चर्चेत भागघेतला. यातील बरेचजण हे पकडले गेलेले किंवा न पकडले गेलेले चोर होते. काय म्हणाले निवृत्त चोर ते आता पाहूया.
एक लक्षात घ्या, हे चोर परदेशातले आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्याच टिप्स आपल्याला लागू पडतील असं नाही.
१. नवीन घरात आल्यांनतर आधी जुना लॉक बदलून घ्या.
२. कार लॉक नसेल तर आत आपल्या मौल्यवान वस्तू ठेवू नका. लॉक नसलेली कार स्वतःच चोरी होण्याची जास्त शक्यता असते.
३. वस्तू अशाप्रकारे ठेवा की त्या अनोळखी लोकांच्या नजरेस पडणार नाहीत.
४. घराच्या चाव्या कुंडीत लपवू नका. (निदान भारतीय लोक तरी अशा प्रकारे चावी लपवत नाहीत.)
५. सेल्समन सोबत आपली माहिती शेअर करू नका. (सेल्समनच्या रुपात चोर असू शकतो)
६. चोरांना लवकरात लवकर तुमच्या घरातून बाहेर पडायचं असतं, त्यामुळे गोष्टी अशा ठिकाणी लपवा जिथे चोर पोहोचू शकत नाही किंवा त्याला संशय येणार नाही.
आणखी टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला संपूर्ण चर्चासत्र वाचायला मिळेल.
https://www.reddit.com/r/AskReddit/comments/dy0yvm/former_burglars_of_reddit_where_is_one_place/
तर मंडळी, अशाप्रकारे पहिल्यांदाच चोरांनी लोकांची शाळा घेतली आहे.




