एका मोबाईल फोनवर एक किलो कांदे फ्री ? कुठे सुरु आहे ही स्कीम ?

कांद्याच्या वाढलेल्या किमतीने एका बाजूला सोशल मिडीयाला मिम्स आणि जोक्सचा नवीन विषय दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला दुकानदारांना नवीन कल्पना दिली आहे. आज आम्ही उत्तरप्रदेशच्या दुकानाची बातमी घेऊन आलो आहोत. या ठिकाणी चक्क कांदा मोफत दिला जातोय.

उत्तरप्रदेशच्या सुरज मोबाईल सेंटरमध्ये एक नवा सेल लागला आहे. एका अँडरॉइड फोनच्या सोबत १ किलो कांदे फ्री देण्यात येणार आहेत. दुकानाबाहेर लावलेली ही जाहिरात पाहा.

कांद्याचा विषय ज्वलंत असल्याने हा फोटो आणि सोबत व्हिडीओ सोशल मिडीयावर लगेचच व्हायरल झाला. सुरज मोबाईल सेंटरच्या मालकाला याचा चांगलाच फायदा झालेला आहे. या नव्या ऑफरमुळे मोबाईल फोन्सची विक्री वाढली आहे.

अगदी अशीच ऑफर तामिळनाडूच्या STR  Mobiles नावाच्या दुकानात ठेवण्यात आली आहे. तिथेही या ऑफरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

मंडळी, काही ठिकाणी कांद्याचे भाव २०० रुपये किलो एवढे प्रचंड वाढले आहेत. अशावेळी मोबाईल सोबत जर कांदा मिळत असेल तर लोकांच्या उड्या पडणारच. तुम्हाला ही कल्पना कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!r4

सबस्क्राईब करा

* indicates required