तुमच्या बाईकसमोर सिंहीण आली तर काय होईल? पाहा बरं या गीरच्या सिंहाणीने काय केलं..

वन्य भाग कमी होत गेला तसं प्राण्यांच्या आणि माणसांच्या चकमकी उडू लागल्या. घरात किंवा वस्तीत बिबट्या शिरल्याच्या बातम्या आता नवीन राहिलेल्या नाहीत. साप तर हमखास आढळतो. भारताबाहेरही फारसं वेगळं चित्र नाही. रशियन नागरिक पांढऱ्या अस्वलांना कंटाळलेले आहेत.  

प्राणी आणि माणसांमधला हा संघर्ष फार जुना आहे. पण आता बहुतेक प्राण्यांनीच माणसांसोबत राहणं शिकून घेतलेलं आहे. गेल्या आठवड्यात एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक महिला पर्यटक हत्तीच्या फारच जवळ गेल्या होत्या. हत्तीने तिला धडक न देता आपल्या सोंडेने हलकेच बाजूला केलं.

प्राण्यांच्या अशा समजूतदार वागण्याचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानातला हा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओत सिंहीण आपल्या दोन पिल्लांसोबत रस्त्यावरून चालत आहे. थोड्यावेळाने तिथे एक बाईकस्वार  येतो. समोर अचानक बाईकला बघून सिंहीण हल्ला करत नाही तर आपला मार्ग बदलते. तिच्या पाठोपाठ तिची पिल्लंही मार्ग बदलतात. जंगलातल्या प्राण्यांनाही माणसांची इतकी सवय झाली आहे की हल्ला कधी करायचा आणि शांत कधी राहायचं हे त्यांनी शिकून घेतलं आहे, हेच यातून दिसून येतं.

हा व्हिडीओ राज्यसभा सदस्य परिमल नथवाणी यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत तो १९००० पेक्षा जास्तवेळा बघितला गेला आहे. १००० पेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे, तर ४२१ लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे.लोकांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलंय की माणसांनी प्राण्यांचा आदर राखला पाहिजे तर काहींनी सिंहिणीच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलंय.

बोभाटाच्या वाचकांचं काय मत आहे? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required