शास्त्रज्ञांनी शोधले प्रकाश निर्माण करणारे द्रव्य.

नुसतं बटन दाबलं की पटकन प्रकाश पडणं हा विज्ञानाने केलेला चमत्कार आहे. विजेच्या मदतीने विशिष्ट वातावरणात विशिष्ट धातू त्यातून प्रकाश बाहेर पडेपर्यंत तापवणं ही त्यामागची शास्त्रीय पद्धत. पण आता  पण आता शास्त्रज्ञांनी  वीज निर्माण करू शकणार्‍या नव्या द्रव्याचा शोध लावला आहे. 

या द्रव्यावर प्रकाश किरणांचा मारा केल्यास त्यातली  अदृश्य इन्फ्रारेड किरणे हे द्रव्य शोषून घेते आणि त्यांना दृश्य प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर फेकते. या द्रव्यात सल्फर आणि टिन या मूलद्रव्याच्या रेणूंची हिर्‍यासारखी रचना बनवण्यात आली आहे आणि या हिर्‍याच्या आकाराभोवती  जैविक कर्बयुक्त आवरण रचण्यात आलेले आहे. अशाप्रकारचे रेणू लेसर किरणांतल्या इन्फ्रारेड प्रकाशाचे फोटॉन्स शोषून घेतात आणि त्यांना परिवर्तित करून दृश्य प्रकाशाच्या रूपात बाहेर फेकतात. पण या नव्या द्रव्यातील रचनात्मक शोधाचे महत्त्व असे की हीच प्रक्रिया आता साधारण प्रकाशातील इन्फ्रारेड किरणांपासूनही करता येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे या द्रव्यातून बाहेर पडणार्‍या प्रकाशाची दिशा नियंत्रित करणेही आता शास्त्रज्ञांना शक्य झालेले आहे. यामुळे ही पद्धती मायक्रोस्कोप आणि प्रोजेक्शन सिस्टीमच्या वापरासाठी अभिनव बनली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required