मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करताय? मग आता एवढा टोल भरावा लागेल !!

तुम्ही जर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. १ एप्रिल २०२० पासून तुम्हाला अधिक टोल भरावा लागणार आहे. किती ते आजच्या लेखात जाणून घेऊया.
कोणत्या वाहनावर किती टोल भरावा लागेल ते पाहू.
१. कारसाठी आता २७० रुपये टोल भरावा लागेल. पूर्वी ही रक्कम २३०रुपये होती.
२. मिनी बससाठी आकारला जाणारा टोल २५५ रुपयांवरून ३२० रुपये होणार आहे.
३. बसेसच्या टोलची रक्कम ६७५ रुपयांवरून ७९७ रुपये होईल.
४. दोन axle असलेल्या ट्रकसाठी ५८० रुपये आकारले जातील. सध्या ४८३ रुपये आकारले जातात.
५. दोनपेक्षा जास्त axle असलेल्या ट्रक्सना १३८० रुपये मोजावे लागतील. सध्या ११६८ रुपये टोल भरावा लागतो.
वाढलेला टोल तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत नक्की द्या.