व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क या कारणासाठी ट्रक अडवण्यात आला...

गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळाल्याचं तुम्ही नक्कीच बघितलं असेल, पण तुम्ही कधी ट्रकच्या हॉर्नला वन्स मोअर मिळाल्याचं पाहिलंय का? मागच्या दोन दिवसापासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकांनी एक ट्रक अडवून धरला आहे. का ते तुम्हीच पाहा.
crazy people stopped this truck just to listen the horn pic.twitter.com/syF8fLKT07
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 25, 2020
ट्रकवाल्या दादाने ‘मै यमला पगला’ दिवाना हे गाणं चक्क ट्रकच्या हॉर्नवर वाजवलंय. लोकांना ते एवढं आवडलं की त्यांनी ट्रक अडवला. यावेळी मागे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
व्हिडीओ नेमका भारतातल्या कोणत्या भागातला आहे हे समजलेलं नाही. असं म्हणतात की मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या रस्त्यांवर हे घडलंय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळजवळ जवळजवळ ९९,००० लोकांनी तो पाहिला आहे. जवळजवळ २८०० लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर, लोकांनी हॉर्नला वन्स मोअर म्हणण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. तुम्हाला असा एखादा किस्सा आठवतो का?