गुडघ्याची वाटी सरकल्यावर तिने जे केलं ते करण्यासाठी हिम्मत लागते !!

तुम्ही फुटबॉल खेळताय आणि तुमच्या गुडघ्याची वाटी सरकली तर काय कराल? या महिला फुटबॉलरने तर मैदानावरच स्वतःहून गुडघा ठीकठाक करून पुन्हा खेळायला सुरुवात केली. तिने दाखवलेली ही हिम्मत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहा.
Our captain Jane O'Toole, is made of tough stuff. Just look at how she dealt with dislocating her knee during our recent game at Inverness.... you can't put a good woman down - she got back up and played the full 90 minutes https://t.co/L8BLAVjmBN
— St Mirren WFC (@stmirrenwfc) February 21, 2020
या महिला खेळाडूचं नाव आहे जेन ओ-तोले. ती स्कॉटिश फुटबॉल टीमची कॅप्टन आहे. सध्या सुरु असलेल्या स्कॉटिश वीमेन्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी ती खेळत होती. सामना सुरु असतानाच ती जमिनीवर कोसळली. तिच्या गुडघ्याचं हाड सरकलं. तिने आरडाओरडा न करता चक्क ठोसे देत गुडघा जागेवर बसवला. यानंतर ती पूर्ण ९० मिनिटं खेळत होती.
ही व्हिडीओ क्लिप जेनच्या टीम मेंबरने शेअर केली आहे. सोशल मिडीयावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी तिचं कौतुक केलं तर कोणी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली. एक गोष्ट तर सगळेच मान्य करतील की तिने दाखवलेली हिम्मत सगळ्यांनाच जमणारी नाही.
तिच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.