हा मनुष्य चक्क उकळत्या तेलात हात घालतो?

दिल्लीच्या करोल बागेतल्या गणेश रेस्तरॉंचे मालक प्रेम सिंग हा जरा अजब माणूस आहे. का म्हणून विचारता? अहो , हे प्रेम सिंग चक्क उकळत्या तेलात हात घालून खाद्यपदार्थ तळतात!! 

आश्चर्य वाटलं ना? पाहा बरं वरचा व्हिडिओ. उकळत्या तेलात हात घालूनही त्यांच्या हाताला काहीच अपाय होत नाही. काहीजण तर फक्त प्रेमसिंगना हाताने तळताना पाहाण्यासाठी  त्यांच्या या  गणेश रेस्तरॉंला भेट देतात.  प्रेम सिंग मासे, वडे आणि इतर बरेच खाद्यपदार्थ हाताने तळतात. पण हे प्रकरण आनुवांशिक आहे. त्यांचे बाबाही उकळत्या तेलात हातानेच मासे तळत म्हणे. 

७०डिग्री सेल्सिअस तापमानात एक सेकंदात माणसाची त्वचा भाजून निघते.आणि उकळतं तेल १६०डिग्री सेल्सिअस तापमानाला असतं. इतक्या उच्च तापमानात इतका वेळ हात घालूनही प्रेम सिंगना काहीही होत नाही.  डॉक्टरांचं म्हणणं आहे की "त्यांची त्वचा अत्यंत नॉर्मल आहे, त्यात इतक्या तापमानात राहू शकण्यासारखं काहीही विशेष वेगळेपण नाहीय. "  कमाल आहे ना?

व्हिडिओ पाहताना मात्र त्यांना हाताने तेल खालेवर करताना पाहून थोडं ’यक्क’ व्हायला होतं. चमत्कार वगैरे सगळं ठीक आहे,  पण एकंदर स्वच्छतेचा विचार करता हे असले हाताने तळलेले पदार्थ खाणं कितपत चांगलं आहे हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required