चक्क हत्तीला खांद्यावर घेऊन जाणारा हा बाहुबली कोण आहे ?

काही दिवसपासून एक फोटो व्हायरल होत आहे. एका माणूस चक्क हत्तीच्या पिल्लाला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. हा फोटो कुठचा आहे, काय झालं होतं तेव्हा, हा माणूस कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधल्यानंतर आम्हाला काय माहिती मिळाली पाहा.

हा फोटो IFS अधिकारी दीपिका बाजपाई यांनी ट्विटरवर नुकताच शेअर केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला. ही घटना २०१७ साली तामिळनाडूच्या मेट्टुपलायम येथे घडली होती. हत्तीला खांद्यावर घेतलेल्या माणसाचं नाव ‘पलानिचामी’ आहे. पलानिचामी हे वनविभाग सुरक्षारक्षक आहेत. त्यावेळी नेमकं काय घडलेलं ते आता आपण जाणून घेऊया.

२०१७ साली वनविभागाला माहिती मिळाली की एक हत्तीण सामान्य नागरिकांवर आणि वाहनांवर हल्ला करत आहे. वनविभागाने हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा चाल आलू. तेव्हा वनविभागाच्या लक्षात आलं की हत्तीण चिखलात अडकलेल्या आपल्या पिल्लाचं रक्षण करत आहे. दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने पलानिचामी यांनी स्वतः चिखलात उतरून पिल्लाचा जीव वाचवला. यासाठी त्यांनी स्वतः पिल्लाला आपल्या खांद्यावर उचललं.

या कथेचा शेवटही गोड आहे. चिखलातून बाहेर काढल्यानंतर पिल्लाची आणि त्याच्या आईची भेट घालून देण्यात आली. हे ज्यांच्यामुळे झालं त्या सुरक्षारक्षक पलानिचामी यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी.

वाचकहो, पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required