computer

गोव्यात पहिल्यांदाच बघीराचं दर्शन घडलंय...आणखी कुठे आढळलाय पाहा !!

मोगलीचा मित्र आणि त्याच्या संरक्षणासाठी सदैव तयार असलेला बघीरा तर तुम्हाला आठवत असेलच. बघीरा म्हणजे काळा बिबट्या. हा प्राणी दुर्मिळ प्राण्यांमध्ये गणला जातो. आता चांगली बातमी ही आहे की गोव्याच्या पेटीएम नेत्रावली अभयारण्यात काळा बिबट्या दिसून आलाय. हा फोटो पाहा. 

हा दुर्मिळ क्षण आहे, कारण नेत्रावली अभयारण्यात यापूर्वी कधीच काळा बिबट्या दिसला नव्हता. हा भाग खरं तर वाघांसाठी ओळखला जातो. तिथे काळा बिबट्या आढळून येणं तसं आश्चर्यकारक आहे. सध्या वनाधिकारी अभयारण्यात आणखी काळे बिबटे आहेत का याचा शोध घेत आहेत. 
दुर्मिळ काळा बिबट्या दिसल्याची ही दुसरी वेळ आहे. काहीच दिवसापूर्वी वनाधिकारी प्रवीण कास्वान यांनी दार्जीलिंगच्या काबिनी  येथे आढळलेल्या काळा बिबट्याचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

आता थोडक्यात काळ्या बिबट्या विषयी जाणून घेऊ.

काळा बिबट्या हा खरं तर बिबट्याचाच रंग बदललेला भाऊ आहे. मेलानिन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त झाल्याने बिबट्याला काळा रंग मिळतो. याच्या उलट मेलानिनच्या कमतरतेमुळे पांढरे वाघ जन्माला येतात.

तर, सगळेच काळे बिबटे गडद काळ्या रंगाचे नसतात. काहींच्या अंगार नेहमीच्या बिबट्यांसारखे चट्टेही दिसून येतात. काळ्या बिबट्याला त्याच्या रंगामुळे घनदाट जंगलात लपून शिकार करण्यास मदत होते. 

या काळ्या बिबट्याचा भाऊ असलेला भारतीय चित्ता सध्या नामशेष होण्याच्या पायरीवर आहे. अशावेळी काळा बिबट्या सारखा दुर्मिळ प्राणी दिसून येणं ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required