computer

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !!

सध्या आपण सगळेच सोशल डिस्टंसिंग म्हणजे अलगीकरणाचं पालन करतोय. पण सर्वच बाबतीत अलगीकरण शक्य नाही. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आपल्याला इतरांच्या संपर्कात यावं लागतं, पण ते म्हणतात ना आवश्यकता हीच शोधाची जननी आहे. काही लोकांनी या समस्येवर पण भन्नाट  उपाय शोधून काढला आहे. उदाहरणासाठी या दुध विक्रेत्यालाच पाहा ना.

फोटोत दिसणारा दुध विक्रेता पूर्णपणे सुसज्ज दिसतोय. त्याने हातमोजे घातले आहेत, तोंड झाकलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुध देण्यासाठी त्याने चक्क लांबलचक पाईपचा वापर केला आहे. ग्राहक आणि त्याच्यात जास्तीत जास्त अंतर राहील याची त्याने पूर्ण काळजी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी केरळच्या दुकानदाराने अशीच पद्धत वापरली होती. खरेदी केलेली वस्तू ग्राहकांना देण्यासाठी त्याने दुकानाबाहेर एक जाड पाईप बसवला होता. पाईप जाड असल्याने जवळ जवळ  सर्वच वस्तू ग्राहकाच्या संपर्कात न येता देता येत होत्या. हा फोटो पाहा.

तुमच्या भागात पण कोणी असा एखादा जुगाड केला असेल तर आम्हला फोटो नक्की पाठवा. पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required