लोकांमधली माणूसकी संपतेय? ही घटना वाचून तुम्हांला काय वाटतं?

दिल्लीत एक घटना घडलीय. रस्त्यावर आंबा विकणाऱ्या एका हातगाडीवाल्याचे सगळे आंबे लोक लुटून घेऊन गेले. या गर्दीसमोर तो बिचारा एकटा काही करू न शकल्याने हतबलपणे हे सगळे पाहण्याव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा काही उपाय उरला नाही.
छोटू असे त्या हातगाडीवाल्याचे नाव सांगितले जात आहे. जवळपास ३० हजार रुपये किंमतीचे त्याचे आंबे चोरी झाले. मात्र हा व्हिडीओ जसा ट्विटरवर वायरल झाला तसा अनेकांनी छोटूला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात प्रसिद्ध संगीतकार विशाल दादलानीचासुद्धा समावेश आहे.
सध्या अनेक लोक कठीण परिस्थितीतून जात आहेत. अशावेळी रस्त्यावरील हातगाडीवाल्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच अनेक ट्विटरकरांनी छोटूच्या बँक अकाउंटची माहिती मागवून घेतली आणि यथाशक्ती मदत केली. आता पर्यंत त्याच्या खात्यात ८ लाख रुपये जमा झाले आहेत
विशाल दादलानीने म्हटलंय की, "आताच एका हातगाडीची लूट करण्यात आल्याची बातमी वाचली. यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी असू शकत नाही. माझ्या ट्विटरवर कोणाकडे त्याची माहिती असेल तर मला द्या! मी त्याची सर्व नुकसानभरपाई देऊन लोकांच्या या क्रूर कृत्याबद्दल त्याची माफी मागेन."
I just read about the mango seller who was robbed by the general public in Delhi. I've never heard anything so shameful.
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) May 22, 2020
If anyone on my timeline can find a way to get in touch with him, I would like to repay his losses with apologies for the heartless behaviour of the thieves.
मंडळी, सध्याच्या या कठीण काळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना जशा घडत आहेत, तशाच माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवून देणाऱ्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणावर घडत आहेत, हेच या घटनेच्या माध्यमातून समोर आले आहे.
लेखक : वैभव पाटील