भेटा हॅरी पॉटरच्या सगळ्या कादंबर्‍या तोंडपाठ असलेल्या रेबेका शॅरॉकला.

Subscribe to Bobhata

ऑस्ट्रेलीयात ब्रिस्बेन येथे राहणार्‍या २५ वर्षाच्या रेबेका शॅरॉकला हॅरी पॉटरचे सगळे खंड तोंडपाठ आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे खरी.  Highly Superior Autobiographical Memory (HSAM) नावाची एक संकल्पना आहे. हिला आता रोग म्हणावं की नाही हा देखील एक प्रश्नच आहे. आता इतक्या चांगल्या स्मरणशक्तीला रोग का मानावं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. थांबा, याचं उत्तर पुढे येईलच. तर या Highly Superior Autobiographical Memory (HSAM) ने  ग्रासलेले  एकूण ८० लोक सध्या जगात आहेत.    ऑस्ट्रेलीयात राहणारी रेबेका ही जगातल्या त्या  ८० लोकांपैकी एक आहे.  

या संकल्पनेला रोग अशासाठी म्हणायचं कारण असं आहे की रेबेकाच्या वयाच्या बारा दिवसापासूनच्या सर्व स्मृती जागृत आहेत. आणि केवळ जागृत नव्हे तर तिला त्या आठवणी त्या वेळच्या भावनांसह त्या अनुभवाला येतात. उदाहरणार्थ तीन वर्षाची असताना रेबेका खेळताना पडली तेव्हा तिच्या गुडघ्याला मार लागला होता. आज जेव्हा तिला ती  आठवण येते तेव्हा आठवणींसोबत गुडघ्यात कळा पण जाणवतात. रेबेका हॅरीपॉटरची फॅन आहे त्यामुळे तिने वाचलेल्या सगळ्या कादंबर्‍या आपोआपच घडघडा पाठ आहेत. सर्व जगाला हेवा वाटावा अशी स्मरणशक्ती रेबेकाला मिळाली आहे पण हे शाप की वरदान हे फक्त रेबेकाच सांगू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required