व्हिडीओ ऑफ दि डे : फुलपाखरांच्या मागे धावणारं हत्तीचं पिल्लू पाहून तुम्हाला तुमचं लहानपण आठवेल !!

बच्चे मन के सच्चे!! लहानपणा इतकं निरागस काही नसतं. कुठलीच भीडभाड न ठेवता मनसोक्त आयुष्य हे फक्त लहानमुलेच जगत असतात. म्हणून तर नेहमी म्हटले जाते की आपल्या आतील बालक जिवंत असायला हवा.
पण हे फक्त माणसांसाठी लागू आहे का? तर निश्चित नाही!! याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एक हत्तीचे लहान मूल फुलपाखरासोबत खेळत आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
Chasing birds & butterflies
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 23, 2020
Who has not done it as a kid?? pic.twitter.com/hi06kKIvG6
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अधिकारी असलेले सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेयर केला आहे. जवळपास 40 सेकंदाच्या या व्हिडीओत हत्तीचे पिल्लू रस्त्यावर फुलपाखरामागे इकडे तिकडे धावताना दिसत आहे.
आपल्या लहानपणचे दिवस पुन्हा आठवण्यासाठी यापेक्षा सुंदर व्हिडीओ असू शकत नाही. व्हिडीओ सगळीकडे वायरल होऊन त्याला लोकांच्या अपेक्षित प्रतिक्रिया येत आहेत.
निसर्ग मनातल्या सुंदर भावना जागृत करतो हेच खरं!