computer

७४ चाकांचा ट्रक, ७०टनाचं सामान आणि प्रवासाला लागले चक्क १० महिने??? हे काय प्रकरण आहे?

एकेकाळी प्रवासाला कित्येक महिने लागत असत. त्याच काळाचा प्रत्यय या लॉकदाऊनमध्ये पुन्हा आला. स्थलांतरितांना गाड्या बंद असल्याने कित्येक आठवड्यांचा पायी प्रवास करावा लागला. पण आजच्या घडीला एका चांगल्या गाडीलासुद्धा प्रवासासाठी कित्येक महिने लागतील का? तर उत्तर आहे हो!!!

एयरोस्पेस प्रॉडक्टसच्या निर्मितीसाठी ऑटोक्लेव मशीन घेऊन एक ट्रक नाशिकहून केरळमधल्या तिरुवनंतपुरमसाठी दहा महिन्यांपूर्वी निघाला होता. तो आता कुठे तिथे जाऊन पोचला आहे. विशेष गोष्ट म्हणजे या ट्रकला चक्क ७४ चाके होती. जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हा ट्रक कसाबसा आपल्या मुक्कामावर पोचला आहे.

या प्रवासात या ट्रकने ५ राज्यांतून प्रवास केला. लॉक डाऊनमुळे प्रत्येक राज्यात केल्यावर ट्रक अडवण्यात येत असे. मंत्र्यांच्या ताफ्याचीसुद्धा घेतली गेली नसेल इतकी काळजी या ट्रकची घेतली जात होती. ७० टन वजन घेऊन जात असलेल्या या ट्रकसोबत एक पोलीस गाडी होती. खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून जिथे खड्डे असतील तिथे आधी रस्ता दुरुस्त केला जात असे. एवढंच नाहीतर रस्त्यात येणारी झाडेसुद्धा कापली गेली. हा ट्रक सुरळीत जावा म्हणून विजेचे खांबही बऱ्याच ठिकाणी काढण्यात आले.

७४ चाकं असलेला हा ट्रक ७० टन वजनाचं एयरोस्पेस ऑटोक्लेव मशीन घेऊन केरळच्या तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथे पोचला. साधारणपणे एवढा प्रवास करायला ५ ते ७ दिवस खूप झाले. पण या ट्रकला हा प्रवास पूर्ण करायला तब्बल १० महिने लागले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा प्रवास सुरु झाला होता. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळेसुद्धा अडचणी वाढल्या होत्या. लॉकडाऊन झाल्यावर आंध्र प्रदेशमध्ये त्यांना महिनाभर थांबावे लागले होते.

हा ट्रक घेऊन जात असलेली ऑटोक्लेव मशीन्सचा उपयोग इसरोच्या अनेक प्रोजेक्टसाठी होत असतो. भविष्यात कदाचित लवकरच आपल्याला इसरोकडून अशा प्रोजेक्टची घोषणा ऐकायला मिळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required