computer

सामान्य गोष्टीतून असामान्य क्षण टिपणारा फोटोग्राफर...या स्पॅनिश फोटोग्राफरचे फोटो पाहून थक्क व्हाल !!

हा खरंतर मूळचा आर्किटेक्ट. पण सध्या फोटोग्राफी करतोय. हा आहे स्पॅनिश कलाकार पाऊ बस्कॅटो. याचे फोटोज सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. त्याने टिपलेली छायाचित्रे पाहून ती केवळ छायाचित्रे नसून अर्थपूर्ण संदेश देणाऱ्या कलाकृती आहेत असं वाटत राहतं.

स्पेनच्या बार्सिलोनात जन्मलेल्या आणि नॉर्वेमध्ये वाढलेल्या पाऊने सुरुवातीला आर्किटेक्ट होण्याचा अभ्यास केला. पण नंतर त्याला असं लक्षात आलं की आपलं पॅशन हे लेन्स आणि त्यातून टिपल्या जाणाऱ्या छायाचित्रांमध्ये आहे. त्यामुळे २०१४ मध्ये त्याने आर्किटेक्चरला रामराम ठोकला आणि कॅमेऱ्यांची लेन्स हातात धरून तो आजूबाजूचे अद्भुत क्षण टिपू लागला! बार्सिलोनाच्या गल्लीबोळापासून ते लंडन आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यांपर्यंत सगळीकडचे क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याने काढलेले फोटो एकाचवेळी इतके चमत्कारी आणि अर्थपूर्ण होते की पाहणारा पाहतच बसे! जर तुम्हाला स्ट्रीट फोटोग्राफीची आवड असेल तर पाऊचे फोटो तुमच्या डोळ्यांना एक अद्भुत आणि मनोरंजक असा अनुभव देऊ शकतात!

त्याचे मास्टरपीस पाहण्याआधी हे लक्षात घ्या की तो २०१७ पासून बर्न माय आयचा सभासद आहे, त्याने जगातल्या प्रत्येक कानाकोऱ्यांत जाऊन, फोटो प्रदर्शनात भाग घेऊन आपल्या फोटोग्राफीने लोकांना एक वेगळा अनुभव दिला आहे आणि त्याचे इंस्टाग्राम वर जवळपास ७०,००० फॉलोअर्स आहेत.

हॉलिवूडच्या चित्रपटांत दाखवतात तशी एखाद्या काळया कमळातून एक स्त्री बाहेर आलीय असं वाटतंय ना? पाऊने परफेक्ट टायमिंग साधून हा क्षण टिपला आहे!

वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे त्रस्त होऊन तो कुत्रा मास्क घालून बसला आहे अस वाटतं ना? या फोटोत पाऊने अत्यंत योग्य अँगल मिळवला आहे!

ही एकाच पक्ष्याचे उडताना टिपलेले वेगवेगळे क्षण नसून सहा वेगवेगळे पक्षी आहेत!

पाठलाग करणाऱ्यांना आगीद्वारे भस्मसात करताना एक स्त्री!!

आपल्या पाऊलखुणा मागे सोडताना....!

जगातली सगळ्यात अवजड प्रवासी बॅग! उचलू शकाल?

फोनमधून दिव्य प्रकाशकिरण बाहेर पडताना...!!

सेम टू सेम!
यातली कुठली जोडी तुम्हाला आवडली?

शब्दांना जेव्हा कृतीची जोड मिळते तेव्हा असा चमत्कार होतो!!

या छत्री घेऊन चाललेल्या माणसाला आजुबाजूच सगळं नॉर्मल दिसत असेल पण आजूबाजूच्या लोकांना हा माणूस नॉर्मल दिसत असेल?

डोळ्यांद्वारे आपल्या मनातील भावना एकमेकांना सांगताना एक कपल!!

माझ्या एकाच्या बलिदानाने जर हजारो जण वाचणार असतील मी आनंदाने बलिदान करेन असं तर ते गुलाब म्हणत नसेल?

लोखंडी पायाचा माणूस!!

ज्यांच्यामुळे आम्हा पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे अशा एका मोबाईल टॉवरला उचलून लांब घेऊन जाताना एक कबुतर!!

 

फोटो कशाचे काढावे हे ठरवायला आणि ते योग्य फ्रेममध्ये बसवायला नजर लागते. या पाऊ बस्कॅटोची नजर त्यासाठी एकदम तयार झाली आहे!!

 

लेखक : वैभव पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required