computer

पब्जी बंद झालं म्हणून हळहळताय? आता आलंय अस्सल भारतीय 'फौ-जी' !!

टिकटॉक बंद झाले तेव्हा अनेक मुलांना काय आनंद झाला होता! पण पब्जी बॅन झाले आणि पोरांचा पार हिरमोड झाला. पब्जमुळे किती मुले मेली, किती वेडी झाली याच्या अनेक बातम्या आल्या. पण पब्जीचे वेड काय कमी होत नव्हते.

अचानक पब्जी बंद झाल्यावर ज्यांना या गेमचे व्यसन लागले होते त्यांचा विरस होणे साहजिक होते. आता यावर जालीम उतारा आला आहे. पब्जीच्या धर्तीवर अस्सल स्वदेशी गेम लाँच झाला आहे. फौजी इंग्लिशमध्ये fau-G म्हणजेच fearless and united- guards या नावाने हा गेम आला आहे.

आता पब्जी फॅन्सनी आनंद व्यक्त करायला हरकत नाही. गेम खेळण्याचा आनंद तो ही स्वदेशी ऍपमध्ये मिळणार म्हटल्यावर आनंद कुणाला नाही होणार? महत्वाचे म्हणजे या गेमच्या समर्थनार्थ खुद्द अक्षय कुमार उतरला आहे.

त्याने ट्विट करत हा स्वदेशी गेम डाउनलोड करण्याचे सगळ्यांना आवाहन केले आहे. भारताच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग म्हणून हा गेम आणला गेला आहे.

बेंगलोर येथील एन कोर या कंपनीने हा गेम तयार केला आहे. ऑक्टोबरच्या शेवटापर्यन्त हा गेम येण्याची शक्यता आहे. गेमच्या कमाईमधून २० टक्के हिस्सा हा भारत के वीर या ट्रस्टला देण्यात येणार आहे. 

गेमिंग इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. अशात स्वदेशी गेम जगभर प्रसिद्ध झाला तर चांगलंच आहे, हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required