हॅरी पॉटरच्या उडणाऱ्या झाडूचा अनुभव देणारी सायकल...केव्हा, कधी, कुठे, कशी?

लहानपणी बघितलेले सिनेमे आणि सिरियल्समधील काही गोष्टी प्रत्यक्षात याव्या असे मोठे झाल्यावर देखील अनेकांना वाटते. 'शाका-लाका बुम-बुम' सिरीयल मधील संजूची पेन्सिल, सोनपरीची छडी, हॅरी पॉटर फॅन्ससाठी तर उडणारा झाडू म्हणजे लय कौतुकाची गोष्ट!!!
या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत हे माहीत असून देखील त्यांच्याबद्दल आपल्या मनात आकर्षण असते. पण जर तुम्हाला असे सांगितले की आता हॅरी पॉटरमधील उडणाऱ्या झाडूची सफर तुम्हाला करता येईल तर? मज्जाच मज्जा नाही का?
रियल फ्लाईंग ब्रूम नावाचा एक प्रोजेक्ट आहे त्याअंतर्गत बनविण्यात आलेली एक युनिसायकल चक्क उडणाऱ्या झाडूचा अनुभव देऊ शकणार आहे. न्यूवेम नावाच्या कंपनीकडून या सायकल तयार केल्या जात आहेत.
या युनिसायकलींची रचना हॅरी पॉटरमध्ये दिसणाऱ्या उडणाऱ्या झाडू सारखीच असणार आहे. उडता येणार नसले तरी उडण्याचा अनुभव नक्की मिळू शकेल असेच या कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
एका इलेक्ट्रिक मोनो सायकलला या जादुई झाडूमध्ये बदलण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉस्टॅटिक पेंट आणि कार्बन स्टील वापरून ही ५१ सेंटीमीटर लांबीची उडणाऱ्या झाडू सारखी दिसणारी सायकल तयार करण्यात आली आहे.
आपल्या रोजच्या गोष्टींना टेक्नोलॉजीच्या मदतीने असं नवीन रूप दिलं जात आहे. समजा ही सायकल भारतात विक्रीस आली तर तुम्ही घेणार का ? कमेंटमध्ये नक्की सांगा !!