computer

निसर्गाने दिलेले आश्चर्याचे धक्के....हे ११ फोटो पाहून घ्या !!

आयुष्य तुम्हाला कोणता नवीन धक्का देईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. रोजच्या नेहमीच्याच आयुष्यात असा एखादा अनुभव येतो किंवा नवीन गोष्टी दिसतात की त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. इंटरनेटवर अनेकांनी त्यांना आलेले अनुभव शेअर केले आहेत. आजच्या लेखातून लोकांनी शेअर केलेल्या याच गोष्टी आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. चला तर पाहूया. 

१. या व्यक्तीला घराच्या मागच्या बाजूस चक्क १०,००० वर्षे जुन्या प्राण्याचे दात सापडले होते. हा प्राणी हत्ती सारखा दिसायचा. आता तो लुप्त झाला आहे.

२. हा काय, मोबाईल्सचा पाऊस पडलाय? नीट पाहिलं तर लक्षात येईल की हे तर साधे दवबिंदू आहेत.

३. चक्क प्रकाश विरघळतोय की काय? खरं तर काचेला चिकटलेल्या बर्फामुळे हा भास निर्माण होतोय.

४. हे चक्क बीव्हर नावाच्या एका छोट्या प्राण्याचं काम आहे.

५. खांबाच्या आजूबाजूच्या भागात हिरवळ नसण्याचं कारण म्हणजे एक कुत्रा तिथे रोज मुत्रविसर्जन करायचा.

६. दाढी कापल्याने काही फरक पडला का?

७. योगायोग पाहा.

८. बर्फाचं मशरूम?

तापमान घसरल्यामुळे पाण्याच्या तोटीतून येणाऱ्या पाण्याचा बर्फ झाला. आणि आश्चर्य पाहा, तो बर्फही मशरूम सारखा दिसतोय. 

९. हे अंडं रंगवलेलं वाटेल पण या अंड्याचा रंग पूर्णपणे नैसर्गिक आहे. एमू पक्षाची अंडी साधारपणे अशाच निळसर रंगात असतात.

१०. ब्रेडवर तरंगणारा कासव अनेक वर्षात एकदाच पाहायला मिळतो.

११. डोळ्यांना वेगळ्या रंगछटा देणारा हेटरोक्रोमिया प्रकार अत्यंत दुर्मिळ असतो. या बाईंच्या डोळ्यातील अर्धा भाग हेटरोक्रोमियाने व्यापलेला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required