computer

हिमा दास आणि द्युती चंदला मागे टाकत पी टी उषाचा विक्रम मोडणारी ही नवीन धावपटू आहे तरी कोण?

भारताला वाऱ्याच्या वेगाने धावणारी नविन धावपटू मिळाली आहे. तमिळनाडू येथील २२ वर्षांची एस धनलक्ष्मी ही ती नविन धावपटू. तिने केलेला पराक्रम वाचला तर तुमची बोटे देखील तोंडात जातील. भारतातील आजच्या घडीला सर्वश्रेष्ठ धावपटू कोण? असा प्रश्न कोणी विचारला तर साहजिक दोन उत्तरे येतील एक म्हणजे हिमा दास आणि दुसरे द्युती चंद. धनलक्ष्मीने या दोघींना पराभूत केले आहे. 

तर भारतातील सर्वश्रेष्ठ धावपटू असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या पी टी उषा यांचा तब्बल २२ वर्ष न मोडलेला विक्रम देखील तिने मोडला आहे. २४ व्या फेडरेशन कप नॅशनल अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने १०० मीटर स्पर्धेत मिळवले आहे. तर २०० मीटर स्पर्धेत तिला रौप्यपदक मिळाले आहे. 

तिने १०० मीटर स्पर्धेत द्युती चंद तर २०० मीटर स्पर्धेत हिमा दासला हरवले, आणि अशा पद्धतीने एकाच स्पर्धेत दोन बलाढ्य स्पर्धकांना हरविण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. त्याचप्रमाणे फेडरेशन कपमध्ये २०० मीटर स्पर्धेत नवा विक्रम केला आहे. २२ वर्षांपूर्वी पी टी उषा यांनी २३.३० सेकंदात धावण्याचा विक्रम केला होता, जो आजवर अबाधित होता. तो रेकॉर्ड मोडीत काढत धनलक्ष्मीने २३.२६ सेकंदात अंतर पार केले आहे. विशेष गोष्ट म्हणजे पी टी उषा यांनी हा विक्रम केला तेव्हा धनलक्ष्मीचा जन्म देखील झाला नव्हता. 

धनलक्ष्मी ही तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील रहिवासी आहे. ती अतिशय गरिबीच्या परिस्थितीत लहानाची मोठी झाली. तिच्या आईने मजुरी करून तिला आणि तिच्या दोन बहिणींना शिकवले आहे. मंगलोर येथील अलावा कॉलेजमध्ये शिकत असताना तिला स्टायपेंड मिळत होता याच स्टायपेंडमुळे तिचा खर्च भागत असे. 

या विक्रमामुळे देशातील सर्वोत्कृष्ट १० एथलिट्समध्ये तिचा समावेश झाला आहे. यामुळे ती अजून स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःचे कर्तृत्व गाजवून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे करू शकते. तिच्या कर्तुत्वावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. तिला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required