computer

१९९७ साली अमेझॉनचे २ शेअर्स विकत घेणाऱ्या जोडप्याने जेफ बेझॉस यांना पत्र लिहून काय म्हटलं आहे?

शेयर मार्केट म्हणले की दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे कमी वेळेत मिळणार मोठा आर्थिक फायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट पडल्यावर बुडणारे पैसे. एकतर माणूस श्रीमंत होतो किंवा बुडतो. शेयर मध्ये पैसे लावणे म्हणजे जुगार तर नाही ना, असा प्रश्न अनेक सर्वसामान्यांना पडतो. पण खरंच असं आहे का? अनेकजण आयुष्यभर अभ्यास करून यात नफा मिळवतात. तर काहीजण जोखीम स्वीकारून आपले नशीब बदलतात. नुकतेच एका जोडप्याने २४ वर्षांपूर्वी घेतलेल्या शेयर्समुळे त्यांचा कसा फायदा झाला याची कहाणी लिहिली आहे. काय आहे हा किस्सा, आज पाहुयात.

अमेझॉन हे नाव सध्या कोण ओळखत नाही? सध्या सगळ्यात नामांकित कंपनी आहे. पण कोणतीही कंपनी सुरुवातीला लहान असते, हळूहळू ती यशस्वी होते. अमेझॉन कंपनीचे शेयर घेतलेल्या अनेक कुटुंबांना या कंपनीच्या वाढत्या किमतीमुळे प्रचंड फायदा झाला आहे. नुकतंच एका पती-पत्नीने कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस यांना पत्र लिहून त्यांचा अनुभव शेअर केला.

२४ वर्षांपूर्वी मेरी आणि लॅरी (गोपनीयतेसाठी नावे बदलली आहेत) यांनी अमेझॉनचे दोन शेअर्स खरेदी केले होते. १९९७ मध्ये जेव्हा अमेझॉनचे शेयर सार्वजनिक झाले तेव्हा त्यांचा मुलगा मुलगा रायन फक्त १२ वर्षांचा होता. त्याच्या वाढदिवसासाठी त्यांनी भेट म्हणून या कंपनीचे दोन शेअर्स खरेदी केले. त्यावेळी ते स्वस्त होते. त्यांनतर १ शेयर साठी २, १ शेयर साठी ३ आणि नंतर २ साठी २ अश्या पद्धतीने शेयर वाढून विभागले गेले. असे एकूण त्यांना २४ शेअर्स मिळाले.

मुलगा लहान होता म्हणून शेअर्स मेरी आणि लॅरीच्या नावावर होते. त्यांनी ते न विकता तसेच ठेवले. त्याचे मूल्यांकन खूप वाढत होते. मग त्यांनी शेयर मुलांच्या नावावर विभागण्याचा निर्णय घेतला. आज रायन नवीन घर विकत घेत आहे. त्या शेयरचा काही भाग विकून तो नवीन घर सहज घेऊ शकतो. या दोन शेअर्समूळे त्यांच्या कुटुंबाला खूप फायदा झाला आहे. वर्षानुवर्षे अ‍ॅमेझॉनची किंमत वाढली. हे पाहून २४ वर्षांपूर्वी गुंतवणूक केल्याचा त्यांना खूप आनंद झाला. म्हणून त्यांनी खास करून जेफ बेझोस यांचे आभार मानले आहे. शेवटी त्यांनी गंमतीने हेही लिहिले की तेव्हा २ ऐवजी १० शेयर घ्यायला हवे होते.

हा जीवन बदलून टाकणारा अनुभव मेरी आणि लॅरी यांनी पत्राद्वारे जेफ बेझोस यांना लिहून पाठवला आहे. सीईओ म्हणून उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल त्यांनी बेझॉस यांचे अभिनंदनही केले आहे. याखेरीज त्यांनी अमेझॉनच्या टीमचंही कौतुक केलं आहे.

शेयर मार्केट म्हणजे लगेच फायदा किंवा तोटा नाही तर एक दीर्घकालीन गुंतवणूकही असते. हे या उदाहरणावरून दिसते. तुमचे काय मत आहे?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required