पाळीच्या अलिकडे-पलिकडे ५ दिवस कोरोना लस घेऊ नये? व्हाट्सऍप नाही, डॉक्टर्स काय म्हणतात ते इथे वाचा!!

फक्त इमेल्स असण्याच्या काळातही फॉवर्ड्स होते, पण आजच्यासारखे बोकाळले नव्हते. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि जोडीला स्वस्त इंटरनेट आल्यानं लोक हवं ते लिहायला लागले आहेत आणि बाकीचे बिनडोकपणे ते फॉर्वर्डही करत सुटले आहेत. या कोरोना काळात तर अफवा आणि फॉर्वर्ड्सचं पेवच जणू फुटलंय.
अफवांपासून लांब राहा!
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे
यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवू नका#FakeNewsAlert pic.twitter.com/D4Ktm8phaq
आता नवीन काय? तर स्त्रियांनी मासिक पाळीच्या आधी आणि नंतर पाच दिवस कोरोना लसीकरण करुन घेऊ नये. का? तर म्हणे या दिवसांत स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि अशा वेळेस लसीकरण करुन घेतल्यास कोरोना होण्याची शक्यता वाढते.
डॉ. शन्तनू अभ्यंकरांची ही पोस्ट वाचा. ते म्हणतात, "मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे शंभर टक्के सत्य असलं तरी या चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही."
हे असले मेसेजेस लिहिणारे लोक मेडिकल कॉलेजमध्ये नक्कीच गेलेले नसतात. पण नको तिथे ते आपले ज्ञानकण उधळत असतात. अशांपासून सावध राहावे हेच खरे!!..