computer

मिझोरमच्या अभयारण्यात तब्बल ७ वर्षांनी पहिल्यांदा वाघ दिसलाय....या फोटोतला वाघ शोधून दाखवा!!

अनेकदा एखादा फोटो दाखवून त्या फोटोत असणारे कोडे सोडवायला सांगितले जाते. पण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होणारा एक फोटो लोकांच्या डोळ्यांची परीक्षा घेत आहे. हा फोटो काही खोटा नाही. हा फोटो खरोखर काढण्यात आलेला आहे. झाडांमध्ये लपलेल्या वाघाला या फोटोत शोधायचे आहे. आता एवढा मोठा वाघ शोधणे काय कठीण आहे हेच कुणाला पण वाटेल. पण तुमचे डोळे आणि एकाग्रता पक्की असल्याशिवाय या वाघाचा थांगपत्ता लागणे मात्र शक्य नाही.

हा फोटो इन्स्टाग्रामवर Sanctuary asia ने शेयर केला आहे. हा फोटो मिझोरमच्या डंपा व्याघ्र प्रकल्पातला आहे. एका कॅमेरा ट्रॅपद्वारे हा फोटो काढण्यात आलेला होता. फोटो व्यवस्थित बघितल्यावर डाव्या कोपऱ्याच्या वरच्या बाजूला हा वाघ दिसतो. सहज म्हणून बघायला गेलात तर वाघाला शोधणे शक्यच होणार नाही.

तसा हा फोटो ऐतिहासिक आहे. कारण हा साधासुधा फोटो नाही. डंपा व्याघ्र प्रकल्पातील गेल्या सात वर्षात मिळालेला वाघाचा हा पहिला फोटो आहे. २०१४ नंतर पहिल्यांदा वाघ दिसल्याने या फोटोचे महत्त्व पण मोठे आहे. या सुंदर फोटोचे क्रेडिट जाते ते फॉरेस्ट गार्ड जखुमा डॉन यांना. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात या भागात कॅमेरा ट्रॅप लावला होता. मे महिन्यात जेव्हा हा ट्रॅप काढण्यात आला तेव्हा हा भन्नाट फोटो मिळाला आहे.

सोशल मिडियावरतर या वाघाला शोधण्याची स्पर्धाच लागली होती. अनेकजणांना वाघ काही सापडलाच नाही, पण काही लोकांनी वाघाला अचूक हेरून फोटो अपलोड केले. तुम्हाल दिसला का वाघ?

सबस्क्राईब करा

* indicates required