डेन्मार्कचे खेळाडू आपल्या मोबाईलवर सतत फिनलँडच्या सामन्याचे स्कोर का तपासत होते?
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाने घोळ घातला असला तरी दुसरीकडे मात्र फुटबॉलमधील मोठी स्पर्धा युरोपियन चॅम्पियन्स लीगमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नुकतेच या सामन्यात एक आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळाली. डेन्मार्कचे खेळाडू आपल्या मोबाईलवर सतत फिनलँडच्या सामन्याचे स्कोर तपासत होते. हे असे का झाले ते जाणून घेण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया.
सलग २ पराभव पचवलेल्या डेन्मार्क संघासाठी कालचा दिवस सुखद होता. त्यांनी ४४ मिनिटांच्या अंतरामध्ये थेट ४ गोल मारत ४-१ अशा फरकाने रशियाला पराभूत केले. आता शनिवारी डेन्मार्कचा पुढचा सामना हा वेल्ससोबत होणार आहे. हा विजय डेन्मार्कसाठी खूप महत्त्वाचा आहे. तब्बल १७ वर्षांनी डेन्मार्कने युरो कपच्या टॉप १६ मध्ये धडक दिली आहे. रशिया मात्र या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे.
९ दिवसांपूर्वी याच मैदानावर झालेल्या सामन्यात फिनलँडविरुद्ध खेळताना डेन्मार्कचा महत्वाचा खेळाडू ख्रिश्चन एरिक्सन याला हृदयविकाराचा झटका आल्याने चालू सामन्यात त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण आता तो पण फिट होऊन परतला आहे. डेन्मार्कसाठी ही गोष्ट हिंमत वाढवणारी आहे.
डेन्मार्कला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फक्त हा सामना जिंकण्याचे महत्त्वाचे नव्हते तर त्याचवेळी बेल्जियम आणि फिनलँड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात फिनलँडचा पराभव होणे पण गरजेचे होते, याच कारणाने डेन्मार्कचे खेळाडू परत परत आपापल्या मोबाईलवर फिनलँडचे काय झाले हे तपासत होते.
प्रत्येक सामान्यागणिक अधिकाधिक रंजक होत जाणाऱ्या या स्पर्धेत पुढे काय होते हे मात्र आता काळच ठरवणार आहे.




