का घेतली धोनीने पत्रकाराची उलट तपासणी?
भारताच्या विंडीज विरुद्ध झालेल्या पराभवानंतर धोनी प्रेस कॉन्फरन्सला पूर्ण तयारीनेच आला होता. “तू रिटायर कधी होणार?” हा प्रश्न एक ना एक पत्रकार आपल्याला विचारणार हे त्याला माहित होतेच आणि ते काम केले एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने. हा प्रश्न विचारताच धोनीने त्याला हसत हसत स्टेजवर बोलावले आणि म्हणाला "आपण थोडी मजा करूयात".
धोनीला खरेतर हा प्रश्न एखाद्या भारतीय पत्रकाराने विचारावा अशी इच्छा होती. म्हणजे त्याला "तुझा भाऊ किंवा मुलगा टीम इंडियाचा विकेटकीपर म्हणून खेळू शकतो काय"? असा प्रश्न विचारता आला असता. "माझा आजचा खेळ बघून तुला मी अनफिट वाटतो काय"? हा धोनीचा पुढचा प्रश्न होता. कसा घडला हा प्रसंग, पहा या व्हिडीओ मध्ये...
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी गेल्या आठवड्यातही एका पत्रकारावर भडकला होता. खरेतर ३४ वर्ष वय झाल्यानंतर आणि टेस्ट्मधून अचानक निवृत्ती घेऊन सगळ्यांना बुचकाळ्यात पाडणारा धोनी अशी काही प्रतिक्रिया देईल असे कुणालाच वाटले नव्हते. या पत्रकार परिषदेनंतर धोनीच्या वागण्याबद्दल काही वर्तुळातून टीकाही होत आहे. पण आपल्या कॅप्टन कूलने त्याच्या निवृत्तीबद्दलचे सगळे प्रश्न या पद्धतीने निकालात काढले.




