computer

फुटबॉल सामन्यात या लहानग्याने काय आगाऊपणा केला? व्हिडीओ पाहिला का?

लहानपण हे अनेक आगाऊ गोष्टींनी भरलेले असते. मोठे झाल्यावर आपण लहानपणी काय काय उचापती केलेल्या हे मोठ्यांकडून ऐकले की प्रत्येकाला हसू आवरत नाही. लहानपण हे असतेच मुळी मनसोक्त जगण्यासाठी!!

आता सीनसीनाटी आणि ओरलँडो सिटी यांच्यादरम्यानचा सामना अशाच एका लहानग्याच्या आगाऊपणामुळे चर्चेत आहे. सामना सुरू असताना आपल्या आईसोबत आलेला एक दोन वर्षांचा मुलगा प्रेक्षक गॅलरीत अगदी मैदानाच्या जवळच बसला होता.

थोड्यावेळासाठी आईचे लक्ष हलले तोवर पठ्ठ्याने धाव घेत थेट मैदान गाठले. मुलगा मैदानावर धावतोय आणि आई त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे, तर तिकडे सामना रंगात आलाय असे चित्र निर्माण झाले होते. शेवटी आईने त्याला पकडले आणि उचलून जागेवर घेऊन गेली.

हा भन्नाट व्हिडीओ जगभर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. मोठा झाल्यावर त्या मुलाला पण ही आठवण हसवणार हे नक्की...

सबस्क्राईब करा

* indicates required