computer

१५००० पर्यंतचा बजेट असेल तर हे आहेत सर्वोत्तम १० स्मार्टफोन्स!!

अतिशय महाग मोबाईल घेण्यापेक्षा लोकांचा ओढा सध्या स्वस्त मोबाईल घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. कारण कमी किंमतीत चांगले फीचर्स असणारे फोन सध्या मिळत आहेत. आज १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या चांगल्या स्मार्टफोन्सबद्दल आज तुम्ही वाचणार आहात.

१) Realme Narzo 30

रियलमीचा हा 5G फोन आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज हवे असेल तर 12,499 रुपयांना हा मोबाईलची मिळू शकेल तर, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज ज्यांना हवे त्यांना 14,499 एवढे रुपये मोजावे लागतील. यात हाय आणि मीडियम ग्राफिक्सचे गेम चालू शकतील असे soc आहे. तसेच मीडियाटेक हेलिओ G95 soc सोबत ऑक्टा कोर सिपीयू आणि द माली G76 GPU अशी भरगच्च सिस्टीम आहे. 6.5 इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. रंगाच्या बाबतीत म्हणायचे तर रेसिंग सिल्व्हर आणि रेसिंग ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh असून 30W चे चार्जर मिळणार आहे. पुढचा कॅमेरा 48 मेगा पिक्सल आहे आणि त्याला 2mp मायक्रो शूटर तर 2mp डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी कॅमेरा हा 16 मेगा पिक्सलचा देण्यात आला आहे.

२) Redmi Note 10

रेडमीच्या नोट सिरीजमधील नवा स्मार्टफोन हा बजेटफोन म्हणून ओळखला जात आहे. ऑल राऊंडर स्मार्टफोन म्हणूनच ही सिरीज ओळखली जात असते. क्वाल्कम स्नॅपड्रॅगन 678 चिपसेट सिस्टीमने हा फोन तयार आहे. तसेच सुपर अमोल्ड डिस्प्ले असल्याने स्क्रीनच्या बाबतीत हा फोन भरदार आहे. 6.43 इंच एचडी स्क्रीन यात असणार आहे. 5000 mAh बॅटरी सोबतीला 33W फास्ट चार्जर 48 मेगा पिक्सलचा मागचा कॅमेरा फक्त दिवसाच नाही, तर रात्री सुद्धा चांगले फोटो घेऊ शकतो. तसेच या किमतीत सहसा इतर कंपन्या देत नाहीत असा 8mp अल्ट्रा वाईड कॅमेरा पण देण्यात आला आहे. हा मोबाईल 4 आणि 6 GB रॅम आणि 64 आणि 128 GB स्टोरेज अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याची डिजाईन प्रभावी असली तरी गेमिंग परफॉर्मन्सच्या बाबतीत मात्र हा स्मार्टफोन तितका प्रभावी नाही. सध्या 13,499रुपये एवढी याची किंमत आहे.

३) Samsung Galaxy M21

हा फोन भारतात नुकताच लाँच झाला आहे. 6.4 इंच अमोल्ड डिस्प्ले, फुल एचडी रिसॉल्युशन + सेल्फी कॅमेऱ्यासाठीचा वाटरड्रॉप नॉच कटआऊट असे फीचर्स यात आहेत. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित oneui 3.1 कोरवर चालतो. कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे, ज्यात 8 एमपी अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 123 डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू आहे. सेल्फी कॅमेरा हा 20 एमपी असून 6000 mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जर आहे. अमेझॉनवर याची किंमत 12499रुपये आहे, तर फ्लिपकार्टवर याची किंमत 144990रुपये आहे.

४) Poco x3

पोकोच्या फोनची मागणी पाहता मध्यम किंमतीत चांगला फोन असे या स्मार्टफोनचे वर्णन करता येईल. पोको एक्स2 मध्ये असलेला प्रोसेसर यात अपडेट होऊन आला आहे. एक्स3 मध्ये स्नॅपड्रॅगन 732G soc प्रोसेसर आहे. 6000 mah ची बॅटरी आणि 33W चार्जर हे याच रेंजमधील इतर फोन्ससारखे यात पण आहे. 15 हजारांचा आत हा मोबाईल घ्यायचा असेल तर 6GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असे पर्याय आहेत. या फोनची स्क्रीन ही 6.67 इंच आहे. 240hz टच सॅम्पलिंग रेट हा गेमिंग फॅन्ससाठी चांगला आहे. IP53 रेटेड फोन असल्याने धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देतो. इतर फोन्सच्या मानाने चांगला असा 64 मेगापिक्सल मागचा कॅमेरा, तर 20 एमपी सेल्फी कॅमेरा यात आहे.

५) Moto G40

यावर्षी एप्रिलमध्ये हा फोन बाजारात आला आहे. 4GB रॅम+64GB स्टोरेज 14 हजारांत, तर 6 GB रॅम +128GB स्टोरेज 16 हजारांत अशी याची किंमत आहे. फ्रॉस्टेड शँपेन आणि डायनॅमिक ग्रे अशा दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे. 120hz रिफ्रेश रेट सहीत 6.78 इंची मोठी स्क्रीन असल्याने स्क्रीनच्या बाबतीत हा मोबाईल उजवा म्हणावा लागेल. यातला प्रोसेसर इतर फोन्सप्रमाणे क्वाल्कम स्नॅपड्रॅगन 732G आहे. मल्टीटास्किंगवाल्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. कॅमेरा 64+16 असा आहे. तर बॅटरी 6000 mAh सोबत 20W फास्ट चार्जर असे आहे. याची किंमत ही 14,499 रुपये आहे.
 

६) Realme 8 5G

रियल मी 8 4G चेच हे वाढीव व्हर्जन आहे. यात तुम्हाला किमतीप्रमाणे 4+64 6+128 8+128 असे स्टोरेज मिळू शकते. 4+64 साठी किंमत 14,499 आहे. 6.5 इंची फोन आणि 90 hz रिफ्रेश रेट अशी स्क्रीन आहे तर बॅटरी मात्र 5000 mAh आहे. सोबत चाजर हे 20W चे असेल. यात तुम्ही 2 सिम आणि एक मेमरी कार्ड ठेऊ शकतात. तब्बल 1 TB पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. सुपरसोनिक ब्लु आणि सुपरसोनिक ब्लॅक असे दोन रंगात हा फोन आहे. तर कॅमेरा हा 48+16 असा आहे.

७) Poco M3 5G

5 चाहत्यांसाठी हा अजून एक चांगला पर्याय आहे. कंपनीचा हा पहिला 5G फोन असून 4+64 स्टोरेजसाठी 13, 999 एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. 6.5 इंची फोन आणि 90 hz रिफ्रेश रेट अशी स्क्रीन आहे तर बॅटरी मात्र 5000 mAh आहे. सोबत चाजर हे 18W चे असेल. कॅमेरा 48+ 8 मेगापिक्सल असा आहे. या फोनमध्ये प्रोसेसर हे ऑक्टा कोर CPU आणि द माली G57 GPU असे आहे.

८) Samsung Galaxy M32

सॅमसंग गॅलक्सिच्या एम सिरीजमधील हा फोन चांगला लोकप्रिय आहे. अमोल्ड डिस्प्ले क्वाड कॅमेरा आणि चांगली बॅटरी यामुळे या फोन उजवा ठरतो. यात मीडिया टेक हेलिओ G80 सोबत ओक्टा कोर सिपीयू प्रोसेसर आहे. 64 + 20 मेगापिक्सल कॅमेऱ्यात अल्ट्रा वाईड अँगल 123 फिल्ड ऑफ विव असे विशेषता आहेत. बॅटरी 6000 mAh आणि चार्जर 15w असे आहे.

९) Redmi Note 10 S

हा फोन भारतात केव्हा येईल याबद्दल अनेकांना कुतूहल होते. बजेट फोनमध्ये त्याची गणना होत आहे. 6+64 स्टोरेजसाठी त्याची किंमत ही 14,999 एवढी आहे. 6.43 इंची फुल एचडी अमोल्ड डिस्प्ले मिळेल. तसेच मीडिया टेक हेलिओ G95 सोबत ऑक्टा कोर CPU आणि द माली G76 GPU असे प्रोसेसर आहे. यात 33W चार्जर असणार आहे. तर कॅमेरा 64 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.

10) Moto G30 64 GB

मोटोच्या मोबाईल्सने गेल्या काही वर्षात चांगले मार्केट मिळवले आहे. सिम्पल डिझाइन असल्याने लोकांना लवकर आपल्याकडे आकर्षित करतो. यात 4+64 gb स्टोरेज असेल हे याच्या नावावरूनच कळते. 5000 mAh बॅटरी तर 20W चे टर्बोपॉवर फास्ट चार्जर यामुळे बॅटरी बॅकअप चांगला असेल. 64 मेगापिक्सल कॅमेरा त्यातही मोटोरोलाची विशेषता असलेला नाईटमोड यामुळे फोटो काढण्याची विशेष मजा यात असेल. अँड्रॉइड 11 मुळे वॅनीला अँड्रॉइडचा अनुभव येईल. हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देणारा आहे. याची स्क्रीन 6.5 इंच ठेवण्यात आली आहे तर किंमत ही अमेजॉनवर 11000 तर फ्लिपकार्टवर 12490 आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required