computer

नीरज चोप्राची भालाफेक पाहिली, आता अभिनय पाहून काय म्हणाल?

ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. नीरज चोप्रावर बायोपिक तयार झाल्यास त्यात तो स्वतः भूमिका करू शकतो इतका तो हँडसम आहे असे मत अनेकांनी नोंदवले आहे. पण सध्या वायरल झालेल्या एका जाहिरातीत त्याची ऍक्टिंग बघितली तर पठ्ठ्या यात देखील मागे नाही याची खात्री पटते

क्रेड ही कंपनी भन्नाट जाहिराती बनविण्यासाठी ओळखली जाते. मागे त्यांनी आपल्या शांत सोज्वळ राहुल द्रविडला गुंडा बनवून टाकले होते. आता नीरज चोप्राला एक दोन नाही,तर एकाच जाहिरातीत चक्क ५ रोल करायला लावले आहेत.

मोजून ४० सेकंदाची असलेली ही जाहिरात आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली. नीरजने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटसवरून ही जाहिरात शेयर केली आहे. 360 डिग्री मार्केटिंग असे कॅप्शन त्याने दिले आहे. ही जाहिरात बघून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

नीरज स्वतः या जाहिरातीत बँकर पासून पत्रकार तर बॉलिवूड सिनेनिर्माता अशा कॅरेक्टर्समध्ये दिसत आहे. ही जाहिरात बघून मात्र नीरज खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे याचा अंदाज प्रत्येकाला आला असेल. ऑलिम्पिक सुवर्णपदकापाठोपाठ आता क्रेडच्या जाहिरातीतुन पठ्ठ्या भाव खाऊन गेला आहे.

-उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required