डिशवॉशर घेताना नेमकं पाहावं काय? भारतात कोणते डिशवॉशर ब्रँड्स जास्त चालतात? त्यांची वैशिष्ट्ये काय?

गेल्या दोन वर्षात किचन उपकरणांमध्ये डिशवॉशरही मोजले जाऊ लागले आहे. इतकी वर्षं भारतीय भांड्यांसाठी डिशवॉशर उपयोगी नाही असे मानले जायचे. पण लॉकडाऊनमध्ये डिशवॉशर घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. आधी मोजक्याच कंपन्या स्पर्धेत होत्या आणि आता अनेक पर्याय आणि वेगवेगळ्या कंपन्याचे डिशवॉशर सहज मिळू लागले आहेत. भांडी घासायचे कष्ट खूप कमी झाल्यामुळे गृहिणी ही आपल्या स्वयंपाकघरात ते असावे यासाठी डिशवॉशर घेण्याचा निर्णय घेतात. आधुनिक भारतीय घरांसाठी डिशवॉशर हे महत्वाचे झाला आहे. पण हे घेताना काय बघावे? कुठला डिशवॉशर सगळ्यात चांगला असा गोंधळ उडत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
डिशवॉशर कसा निवडावा?
मुख्यतः ८,१०,१२,१३ प्लेस सेटिंग डिशवॉशर उपलब्ध असतात. प्लेस सेटिंग म्हणजे तेवढ्या प्लेट्स बसतात. साधारण ४ माणसं कुटुंबात असतील तर १२,१३ प्लेस सेटिंग डिशवॉशर तुम्ही पाहू शकता. कुटुंबातील संख्या कमी असेल तर ८,१० प्लेस सेटिंग डिशवॉशर तुम्ही निवडू शकता. डिशवॉशर मध्ये काच, उच्च दर्जाचे प्लास्टिक, स्टील, लाकूड अशी भांडी स्वच्छ निघातात. नॉनस्टिक आणि अल्युमिनियम भांडी यात वापरू नयेत. यासाठी पावडर,सॉल्ट ही लागते ते ऑनलाईन किंवा मॉलमध्ये सहज मिळते. याशिवाय डिशवॉशर घेण्यासाठी सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्टेनलेस-स्टीलचा टब. यात भांडी लवकर कोरडी होतात आणि आवाजही कमी होतो. प्लास्टिकपेक्षा स्टील जास्त काळ टिकते.
डिशवॉशर खरेदी करण्यापूर्वी खाली गोष्टी विचारात घ्या
- डिशवॉशरचा प्रकार
- आकार
- क्षमता
- टब प्रकार
- वापर
- डिशवॉशरची वैशिष्ट्ये
- ऊर्जा आणि पाणी कार्यक्षमता
- कंपनीची सर्व्हिस
डिशवॉशरचा कोणता ब्रँड सर्वोत्तम आहे?.
सीमेन्स, आयएफबी, बॉश, व्होल्टास आणि एलिकासह बरेच चांगले डिशवॉशर ब्रँड आहेत. काही भारतीय ब्रँड ही यात उतरले आहेत. तुम्ही कुठल्या शहरात राहता, त्याप्रमाणे हे उपलब्ध असतील.
टॉप ५ ब्रँड डिशवॉशर ब्रँड खालीलप्रमाणे:
Siemens 12 Place Settings Dishwasher सीमेन्स SN26L801IN फ्रीस्टँडिंग डिशवॉशर
सीमेन्स ब्रँडचा डिशवॉशर अतिशय कमी वेळेत भांडी स्वच्छ करून देतो. यामध्ये वॉश सायकल कमी करता येते. या मशीनचा फार आवाज येत नाही. यामध्ये स्टेनलेस स्टील/पोलिनॉक्स इंटीरियर असते ज्यामुळे भांडी लवकर कोरडी होतात. भांड्यावरचे सगळे जीवजंतू ९९.९९% मारले जातात असा दावा कंपनी करते. याची किंमत ३७,५००रुपयांपासून पुढे सुरू होते.
IFB Neptune VX Fully Electronic Dishwasher आयएफबी नेपच्यून व्हीएक्स इलेक्ट्रॉनिक डिशवॉशर
IFB डिशवॉशर सर्वात जास्त विकला जाणारा ब्रँड ठरले आहे. यात १२ प्लेस सेटिंग्ज येते. तसेच कमी भांडी असल्यास अर्धा-लोड हा पर्यायही उपलब्ध आहे. IFB चे पावडर व सॉल्ट ही येते. यामध्ये वॉटर सॉफ्टनिंग डिव्हाइस आहे ज्यामुळे बोरिंगच्या पाण्याने भांड्याचे काही नुकसान होत नाही. याची किंमत ३५,७५० रुपयांपासून पुढे सुरू होते.
Bosch 12 Place Settings Dishwasher बॉश 12 प्लेस सेटिंग्ज डिशवॉशर (SMS66GI01I)
IFB सारखेच बॉशचा डिशवॉशर हा एक सर्वात जास्त चालणारा डिशवॉशर आहे. हा ८,१०,१२,१३ प्लेस सेटिंग्जमध्ये येतो. यात वॉश प्रोग्राम वेळ लावता येतो. तासाभराने जर मशीन लावायचे असले तर ती सेटिंग करता येते. पाणी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी यात लोडसेन्सर हे वैशिष्ट्य दिले आहे. याची किंमत ४५,९९० रुपयांपासून पुढे सुरू होते.
Voltas Beko 8 Place Table Top Dishwasher व्होल्टास बेको 8 प्लेस टेबल टॉप डिशवॉशर
भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक म्हणजे वोल्टास. हा ८ प्लेस टेबल टॉप डिशवॉशर आहे. कुटुंबातील सदस्य संख्या कमी असेल तर हा सर्वात कार्यक्षम आणि टिकाऊ डिशवॉशर आहे. यात ६ वॉश प्रोग्राम आहेत जे आपल्या सर्व धुण्याच्या गरजा पूर्ण करतात. इतर डिशवॉशर प्रमाणे यातही वेळेच्या आणि वेगवेगळ्या सेटिंग दिल्या आहेत. याची किंमत १९,९९०रुपयांपासून पुढे सुरू होते.
Elica WQP12-7605V WH Dishwasher एलिका 12 प्लेस सेटिंग्ज डिशवॉशर 12 प्लेस सेटिंग
Elica WQP12-7605V WH डिशवॉशर हा पाणी आणि ऊर्जा वापराच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आहे. यात क्रोकरी आणि जास्त तेलकट भांडी खूप स्वच्छ निघतात. यात स्टेनलेस स्टीलचे आतले इंटीरियर असते. याचे फिनिशिंग स्वयंपाकघरातील सजावटीला खूप शोभून दिसते. याची १२ प्लेस मशीनची किंमत २७,९९०रुपयांपासून पुढे सुरू होते.
या सर्व मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. दिलेल्या किंमती या ठिकाणानुसार बदलू शकतात. तुम्हाला माहिती आवडल्यास जरूर शेअर करा. तुम्ही डिशवॉशर वापरत असल्यास तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा
शीतल दरंदळे