आपला साऊथचा 'अय्यो' आता झाला इंग्लिश !! अॉक्सफर्ड फॅमिलीत एन्ट्री!!
एरव्ही आपल्याला दक्षिण भारतातली लोकं भेटली किंवा दिसली की ती बोलताना सारखं अय्यो, अय्या हे शब्द वापरताना दिसतात. बर्याच चित्रपटातून आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात. आपल्याला तर ते ऐकून सवयच झाली आहे, पण आता जगप्रसिद्ध अॉक्सफर्ड डिक्शनरीनंसुद्धा या शब्दांची नोंद घेतलीय...
इंग्लिश भाषेचं बायबल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॉक्सफर्ड शब्दकोशात दरवर्षी काही नवीन शब्द नोंद केले जातात. हे शब्द जगातील वेगवेगळ्या बोलीभाषांमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे असतात. या वर्षी सप्टेंबरमध्ये जाहिर झालेल्या अॉक्सफर्डच्या यादीत 'अय्यो' आणि 'अय्या' हे दक्षिण भारतीय शब्दांना स्थान देण्यात आले आहेत. मागच्या वर्षी हिंदी मधला 'यार' हा शब्द अॉक्सफर्ड मध्ये समाविष्ट झाला होता.
भिती, आश्चर्य, आनंद, वेदना, अशा एक ना अनेक भावना व्यक्त करणारे हे शब्द आता अॉक्सफर्डच्या डिक्शनरीत आहेत हे ऐकून पण काही जणांनी 'अय्यो!!' असंच म्हटलं असेल.. नाही का ?




