computer

पिल्लाला वाचवण्यासाठी थेट मगरीला मारुन टाकणारी हत्तीण. कुठला आहे हा व्हिडिओ?

आई आणि मूल हे नातंच वेगळं असतं. घार हिंडते आकाशी असो वा हिरकणीची गोष्ट, आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी एखादी आई ही कुठल्याही प्रकारचा त्याग करू शकतो. याचे उदाहरण अनेक गोष्टींमधून आपल्याला पाहायला मिळते. याला प्राण्यांचा पण अपवाद नाही. प्राण्यांमधील आई सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते.

हत्ती ही प्राणीजात तशी शांत म्हणून ओळखली जाते. आपण भले आणि आपले काम भले असे त्यांचे एकूण जगणे असते. पण जर आपल्या पिल्यांवर संकट आले तर हत्तीणही आक्रमक होऊ शकते याचा प्रत्यय देणारा व्हिडिओ आज तुम्ही बघणार आहात.

हंस हेन्रीक यांनी झांबिया येथील सफरी दरम्यान हा व्हिडिओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. या व्हिडिओत एका मगरीपासून आपल्या पिल्यांचे रक्षण करण्यासाठी ही हत्तीण थेट त्या मगरीलाच मारून टाकते.

मगर त्यांचे वास्तव्य असलेल्या तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या कमी शक्तीच्या प्राण्यांची शिकार करण्याच्या बेतात नेहमी असतात. म्हणून तळ्याच्या जवळ असलेल्या आपल्या पिल्यांना धोका होऊ नये म्हणून ही हत्तीण मगरीला मारून टाकते असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

या व्हिडिओत दिसते की, आधी तर हत्तीण आपल्या डोक्याने या मगरीला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही सेकंदात ती आक्रमक होते आणि आपल्या प्रचंड वजनाखाली त्या मगरीला मारून टाकते. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मनुष्य असो वा प्राणी-पक्षी, बाळांसाठी आई जीवावर उदार होतेच!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required