गुगल पे, फोन पे सोडा व्हाट्सएप पेमेंट वापरा आणि ५१ रुपये कॅशबॅक घ्या!!!
व्हाट्सएपवर पेमेंट करण्याची सुविधा येऊन बरेच दिवस झाले तरीही लोकांना फोन पे आणि इतर ऍप्सची असलेली सवय यामुळे व्हॉटसएप पे ला काय डिमांड मिळत नाहीये. जेव्हा दुकान चालत नाही तेव्हा काय केले जाते? डिस्काउंट देणे!! पण या ऑनलाइन पेमेंट देणाऱ्या कंपन्यांचा डिस्काउंट वेगळा असतो.
व्हाट्सएपच्या माध्यमातून पेमेंट केले तर व्हाट्सएप ५१ रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. याआधी पण इतर कंपन्यांनी हेच केले असले तरी फायदा होणार असेल तर संधी कशाला सोडावी? पहिल्या ५ पेमेंटसवर ५१ रुपये कॅशबॅक फिक्स मिळेल आणि त्यासाठी कुठलीही लिमिट ठरलेली नाही. म्हणजे एक रुपया, पाच रुपये असे पाठवूनही कॅशबॅक मिळवता येईल.
पेमेंट केल्या केल्या ५१ रुपये अकाउंटमध्ये जमा होतात. आताही ऑफर नेमकी किती दिवसांसाठी आहे काय माहित म्हणून ज्यांना ही ऑफर आवडली असेल त्यांनी त्वरा करायला हरकत नाही. आता हे कॅशबॅक कसे मिळवायचे ते ही सांगूनच टाकू.
१) चॅट विंडोमध्ये वर जे तीन टिम्ब दिसतात त्यावर क्लिक करून मग पेमेंटचा पर्याय निवडा.
२) जर आधी व्यवहार/ transaction केले नसेल तर आपले बँक डिटेल्स टाकावेत.
३) अमाऊंट टाकून एंटर करावे.
४) पेमेंट पूर्ण करण्यासाठी यूपीआय पिन टाकावा.
५) तुम्हाला पेमेंट पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
तर या साध्या सोप्या पध्दतीने तुम्ही घरबसल्या कॅशबॅक मिळवू शकता.
उदय पाटील.




