सुशीलकुमार चलें अमेरिका, आता WWE च्या आखाड्यात?
भारताला ऑलम्पिकमध्ये दोनवेळा पदक मिळवून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार आता चक्क WWE च्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. WWE च्या टॅलेंट डेव्हलपमेंट हेडने सुशील कुमारची भेट घेतली आहे. अजूनतरी या गोष्टीचं कन्फर्मेशन सुशील किंवा त्याच्या टीमकडून आलेलं नाही. पण जर सुशीलने ही स्टेप घेतली तर आपल्या लाडक्या खलीनंतर भारताचं नाव WWE मध्ये परत एकदा जोरदार होईल.
सुशीलकुमार दुखापतीमुळे ऑलिंपिक पात्रताफेरीला मुकला. त्यानंतर नरसिंग यादव आणि त्याच्या सिलेक्शन वरून कुस्ती संघटनेनं घातलेला गोंधळ अजूनही ताजा आहे. कदाचित याच कारणामुळं सुशील प्रोफेशनल कुस्तीचा विचार करू लागला असावा. WWE साठी भारतीय बाजारपेठ महत्वाची आहे आणि त्यात सुशीलसारखा स्टार त्यांना मिळाळा, तर त्यांच्या लोकप्रियतेत वाढच होईल. येत्या काही दिवसांत काय घडामोडी होतात त्याकडे आम्ही तुमच्यासाठी लक्ष ठेवून आहोत. सुशीलने हे पाऊल उचलाव का? याबद्दल तुमचं काय मत आहे?