साधा टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रुपांतरित करण्याचे ४ उपाय!!

टीव्हीचा आणि लोकांचा संपर्क कमी झाला आहे. आता लोकांचा ओढा मोबाईलकडे वाढला आहे. त्यात स्मार्टटीव्ही आले आहेत. स्मार्टटीव्हीवर ॲप्स इन्स्टॉल करता येतात आणि मोबाईलवर पाहाण्याच्या गोष्टी आणखी मोठ्या स्क्रीनवर पाहाणं हा अनुभव चांगलाच असतो. आता ज्यांच्याकडे स्मार्टटीव्ही नाही आणि त्यांना स्मार्ट गोष्टी बघायच्या आहेत त्यांची अशावेळी पंचाईत होते. तर स्मार्ट टीव्ही असूनही स्मार्टटीव्हीचा आनंद घ्यायचा असेल तर पुढे वाचा.

सेट टॉप बॉक्स

सध्या जेव्हा तुम्ही डिटीएच बॉक्स घेता तेव्हा सोबत एक बॉक्स येतो. हा बॉक्स बऱ्याच डिटीएच कंपन्या देतात. हा बॉक्स वापरून तुम्ही युट्यूब किंवा इतर ओटीटी स्ट्रिमिंग टीव्हीवर पाहू शकता. टाटा स्काय बिंज किंवा एयरटेल एक्सस्ट्रीम यांचे स्मार्ट सेटटॉप बॉक्स असतात. यासाठी तुम्हाला वायफायची गरज पडेल. तुमच्याकडे आधीच डिटीएच आहे, तर काय करावे हा प्रश्न पडला असेल तर एकतर नवे डिटीएच घ्यावे किंवा मग आहे तेच अपग्रेड करून घ्यावे. अपग्रेड करताना अनेकवेळा वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात, त्याकडेही लक्ष दिल्यास तुमचा फायदा होईल.

सध्या जिओ फायबर फॉर्मात आहे. जिओ फायबर विकत घेतल्यावर वाय फाय मशिनसोबत एक सेट टॉप बॉक्स येतो. या सेटटॉप बॉक्सवर तुम्ही लाईव्ह स्पोर्ट्स, सिनेमे बघू शकतात. विशेष म्हणजे जिओ फायबर घेतल्यावर काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळतात. तशा इतर ठिकाणीही काही ना काही ऑफर सुरूच असतात. ऍपल मोबाईलवाले ऍपल टीव्हीचा वापर करू शकतात.

फायर स्टिक

ज्यांना फक्त अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्म बघण्यात रस असेल तर यासाठी फायरस्टिक बेस्ट आहे. यात सेट टॉप बॉक्स सारखंच एक डिव्हाईस असते पण ते आकाराने छोटे असते. सरळ HDMI पोर्ट मध्ये डिवाइस लावा त्याला WiFi ला जोडा आणि मग झालाच तुमचा टीव्ही स्मार्ट. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या साठी तुमचा फोन लागत नाही, फायर स्टिक स्वतंत्र्य पणे वापरता येऊ शकते. हा पण टीव्हीला HDMI पोर्ट असणे गरजेचे आहे.  

क्रोमकास्ट

जर तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर गुगल क्रोम कास्ट घ्यावे. यामुळे तुम्हाला टीव्हीवर मोबाईल स्क्रीन आणि ॲप्स कास्ट करता येतील. थेट अँड्रॉइड फोन ज्यांना टीव्हीवर मिरर करायचा असेल तर त्यासाठी आपण टीव्हीवर एचडीएमआय पोर्टमध्ये क्रोमकास्ट लावून आपल्या स्मार्टफोनवर मिरर करता येईल. अनेक मोबाईल ऍप्स जसे नेटफ्लिक्स, VLC मिडिया प्लेयर हे टीव्हीवर पाहता येतील. डाँगल किंवा स्टिक दोन प्रकारच्या असतात. एक तुम्हाला वॉल ॲडाप्टरसोबत लावावे लागते, तर दुसरे टीव्हीच्या यूएसबी पोर्टमध्ये लावता येऊ शकते.

HDMI केबल

केबल हा तसा स्वस्त उपाय आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने एचडीएमआय केबल घेऊ शकता आणि मोबाईल टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडू शकता. पण यात अडचण अशी असते की केबलमुळे मोबाईल नेहमी टिव्हीजवळ ठेवावा लागतो.

तर या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही साधा टीव्ही स्मार्टटीव्हीमध्ये बदलू शकता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required