कुत्र्याने पाडसाला बुडताना वाचवून मने जिंकलीत!! हा व्हिडिओ पाहाच!!

कुत्रा हा प्राणी प्रामाणिक म्हणून तर जगात प्रसिद्ध आहे, पण त्याचबरोबर ही जमात किती निस्वार्थ असते याचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे बघून पुन्हा एकदा कुत्र्यांबद्दल असलेला आदर द्विगुणित होईल.

या व्हिडिओत एक छोटे हरीण नदीत बुडत असताना दिसत आहे, पण ऐनवेळी एका पाळीव कुत्र्याने दाखवलेल्या चपळाईमुळे या पाडसाचे प्राण वाचले आहेत. योगायोगाने त्या कुत्र्याचा मालक तिथे उपस्थित असल्याने त्याने हा सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली.

 

या व्हिडिओ बघितल्यावर हा कुत्रा किती झपाट्याने नदीत प्रवेश करतो आणि तिथे पोहत त्या पाडसाला वाचवतो हा सर्व प्रकार शौर्याचाच म्हणावा लागेल. याच कारणाने हा व्हिडीओ चौफेर शेयर केला जात आहे.

कुत्रा शक्य होईल तितक्या वेगात नदीत पोहत पाडसाजवळ जातो, पाडस तोवर प्राणाच्या आकांताने ओरडत असते. शेवटी हे कुत्रे त्या पाडसाला पाण्यातून वाचवण्यात यशस्वी ठरते. पण तिथेच तो थांबत नाही, तर या पाडसाला तो सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो.

हा सर्व प्रकार सुरू असताना, कुत्र्याचा मालक सातत्याने आपल्या कुत्र्याला प्रोत्साहन देत असतो. शेवटीही पाडस वाचले तेव्हा तो आपल्या कुत्र्याला कौतुकाचे शब्द बोलतो. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट नसले तरी माणसाचा हा बेस्टफ्रेंड जगातील प्रत्येक प्राण्याचा बेस्टफ्रेंड असतो हे ही स्पष्ट झाले आहे.

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required