computer

IPL २०२२ मध्ये किती पैसे, कोणत्या संघाने कोणते खेळाडू किती कोटींना राखून ठेवले, हे सगळे जाणून घ्या इथेच!!

आयपीएलचा नवा सीझन कधी सुरू होईल याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पण त्याहीपेक्षा जास्त सर्वांचे लक्ष लागून आहे. ते खेळाडूंच्या बोलीकडे!! यावर्षी कोणता खेळाडू कितीला विकला जातो आणि कोणता संघ कुठल्या खेळाडूला विकत घेतो यावर क्रिकेट शौकिनांच्या नजरा खिळून आहेत.

१२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचे मेगाऑक्शन आयोजित करण्यात आले आहे. मेगाऑक्शनमध्ये आयपीएल संघांना काही खेळाडू राखून ठेवता येतात. यावेळी प्रत्येक संघाला ४ खेळाडू राखून ठेवता येणार आहेत. यावेळी मात्र आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल होत आहेत. हे आहेत लखनऊ आणि अहमदाबाद संघ. हे संघ सामील झाल्याने एकूण १० संघ लिलावात भाग घेणार आहेत.

यावेळी जगभरातील ५९० खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. त्यापैकी ३७० खेळाडू भारतीय आहेत, तर २२० खेळाडू परदेशी आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे सर्वात जास्त म्हणजे ४७, वेस्टइंडिजचे ३४, दक्षिण आफ्रिकेचे ३३, श्रीलंकेचे २३, न्यूझीलँड आणि इंग्लंड प्रत्येकी २४, अफगाणिस्तानचे १७, आयर्लंड आणि बांगलादेश प्रत्येकी ५, नामिबियाचे ३, स्कॉटलँडचे २, नेपाल, झिम्बाब्वे आणि अमेरिकेचे प्रत्येकी १-१ खेळाडू आहेत.

या ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू कॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेले, तर ३५६ अनकॅप्ड खेळाडू आहेत. तर सात खेळाडू हे सहकारी देशांचे आहेत. प्रत्येक खेळाडूची एक बेस प्राईस म्हणजे मूळ किंमत असते. या मूळ किंमतीपासून खेळाडूची बोली सुरू होते. एकूण ४८ खेळाडूंनी स्वतःची बेस प्राईस २ कोटी ठेवली आहे, तर २० खेळाडू १.५ कोटीवर आहेत. तर ३४ असे खेळाडूंची बेस प्राईस १ कोटी रुपये आहे.

प्रत्येक संघाला एकूण ९० कोटींचे बजेट देण्यात आले आहे. ज्या संघाने आपले ४ खेळाडू राखून ठेवले आहेत त्यांच्याकडून ४२ कोटी कापले जाणार आहेत. यात पहिल्या खेळाडूची किंमत १६ कोटी, दुसऱ्या खेळाडूची किंमत १२ कोटी, तिसऱ्याची ८ आणि चौथ्याची ६ कोटी असणार आहे. तीन खेळाडू राखून ठेवले तर ३३ कोटी, दोन खेळाडू २४ कोटी, आणि फक्त एक खेळाडू राखून ठेवला १४ कोटी संघाच्या पर्समधून कापले जाणार आहेत.

पंजाब संघाने २ खेळाडू राखून ठेवले तरीदेखील त्यांचे २८ कोटी पर्समधून कापले गेले. खरंतर पंजाबने मयंक अग्रवाल बारा कोटी आणि अर्शदीप सिंगला ४ कोटी देऊन रिटेन केले. पण नियमानुसार त्यांचे २८ कोटी कापले गेले.

आयपीएलच्या रिप्लेसमेंट नियमानुसार जर एखादा खेळाडू जखमी झाला किंवा त्याला कोरोना झाला तर त्याच्या जागी अशाच खेळाडूला घेता येईल जो आयपीएल लिलावात सहभागी झाला असेल. जे खेळाडू लिलावात सहभागी झाले नाहीत, त्यांना कुठल्याही परिस्थितीत घेता येणार नाही.

खेळाडू राखून केलेल्या संघांमध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली यांनी प्रत्येकी ४ खेळाडू रिटेन केले आहेत, हैदराबाद, राजस्थान आणि बंगळुरू यांनी ३ खेळाडू रिटेन केले आहेत, तर पंजाबने २ खेळाडू रिटेन केले आहेत.

संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.

Chennai Super Kings

रविन्द्र जडेजा (१६ कोटी), एमएस धोनी ( १२ कोटी) मोईन अली (आठ कोटी) ऋतुराज गायकवाड ( ६ कोटी)

पर्स : ४८ कोटी

एकूण स्लॉट : २१

ओवरसीज प्लेयर स्लॉट : सात

Kolkata Knight Riders

आंद्रे रसल (१२ कोटी, पर्समधून १६ कोटी कापले गेले आहेत) वरुण चक्रवर्ती (८ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी) सुनील नरेन (६ कोटी)

पर्स : ४८ कोटी

एकूण स्लॉट : २१

ओवरसीज स्लॉट : ६

Sunrisers Hyderabad

केन विलियमसन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी ), उमरान मलिक (४ कोटी)

पर्स : ६८ कोटी

एकूण स्लॉट : २२

ओवरसीज स्लॉट : सात

Mumbai Indians

रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी) सूर्यकुमार यादव (७ कोटी), कायरन पोलार्ड (६ कोटी)

पर्स : ४८ कोटी

एकूण स्लॉट : २१

ओवरसीज स्लॉट : सात

Royal Challengers Bangalore

विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) मोहम्मद सिराज (सात कोटी)

पर्स : ५७ कोटी

एकूण स्लॉट : २२

ओवरसीज स्लॉट : सात

Delhi Capitals

ऋषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल ( ९ कोटी) पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिक नॉर्किए (६.५ कोटी)

पर्स : ४७.५ कोटी

एकूण स्लॉट : २१

ओवरसीज स्लॉट : सात

Rajasthan Royals

संजू सैमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी), यशस्वी जायसवाल (4 कोटी)

पर्स : ६२ कोटी

एकूण स्लॉट : २२

ओवरसीज स्लॉट : सात

Punjab Kings

मयंक अग्रवाल (१२ कोटी) अर्शदीप सिंह (४ कोटी)

पर्स : ७२ कोटी

कुल स्लॉट : २३

ओवरसीज स्लॉट : आठ

Lucknow Super Giants

के.एल. राहुल (17 कोटी), मार्कस स्टोइनिस (९.२ कोटी), रवि बिश्नोई (४ कोटी)

पर्स : ५९ कोटी

एकूण स्लॉट : २२

ओवरसीज स्लॉट : सात

Ahmedabad Franchise

हार्दिक पंड्या (१५ कोटी), राशिद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी)

पर्स : ५२ कोटी

एकूण स्लॉट : २२

ओवरसीज स्लॉट : सात

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required