PKL 2022 फायनल : रोमांचक सामन्यात बाजी मारत दबंग दिल्लीने कोरले जेतेपदावर नाव

प्रो कबड्डी लीग २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यातील शेवटच्या क्षणी दबंग दिल्ली संघाने बाजी मारत जेतेपदावर नाव कोरले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दबंग दिल्लीने हा पराक्रम केला आहे.

दबंग दिल्ली संघाकडून विजयने सर्वाधिक १४ पॉईंट्सची कमाई केली. ज्यामध्ये ८ टच पॉइंट, ५ बोनस पॉइंट्स आणि १ टॅकल पॉइंटचा समावेश आहे. अप्रतिम कामगिरी करत असलेल्या विजयला नवीन कुमारने चांगलीच साथ दिली. त्याने चढाई करताना १३ पॉइंट्सची कमाई केली. तर पटना पायरेट्स संघासाठी सचिनने १० आणि गुमान सिंगने ९ गुणांची कमाई केली. 

या सामन्याच्या सुरुवाती पासूनच दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली होती. सुरुवातीचा ३ मिनिटांचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघ ३-३ पॉइंट्सने बरोबरीत होते. त्यानंतर पटनाने जोरदार पुनरागमन करत दबंग दिल्ली संघावर १२-९ पॉइंट्सने आघाडी घेतली. एक डाव संपल्यानंतर पटना संघ १७-१५ ने आघाडीवर होता. त्यानंतर शेवटच्या क्षणी दबंग दिल्ली संघाने बाजी मारली आणि या सामन्यात ३७-३६ ने जोरदार विजय मिळवला.

सबस्क्राईब करा

* indicates required