पुण्यातून आता थेट स्वर्गात बससेवा

पुण्याबद्दलच्या कुठल्याही आश्चर्यकारक बातमीत पुणे तिथे काय उणे ही लाईन वापरायची पद्धत आहे. आमचा फाऊल धरला जाऊ नये म्हणून या दोन ओळी आम्ही अर्पण करत आहोत. तर मंडळी, काही इंडिया टीव्हीछाप चॅनल्सनी मध्यंतरी स्वर्गाचा रस्ता शोधण्याचं काम सुरु केलं होते. "इसी रास्ते गये थे पांडव स्वर्ग" वगैरे प्रोग्राम्स तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही आयुष्यातल्या एका निर्मळ आनंदाला मुकला आहात. या न्यूज चॅनलला स्वर्गाचा रस्ता पुण्यातून जातो हे कळालं नाही हे फार वाईट!!

तर आता नव्याने व्हायरल झालेल्या माहितीनुसार आपल्या लाडक्या पीएमपीएमलने एक नवी बीआरटी बससेवा सुरु केली आहे. ह्या बससेवेचे वैशिष्टय असं आहे की ती प्रवाशांना डायरेक्ट स्वर्गात पोहोचवते. तसे डिजिटल बोर्ड पण लागले आहेत.अहो, पीएमपीएल रफ चालवण्यासाठी कितीही बदनाम असली तरी ते खरंच तुम्हाला स्वर्गात पोहचवणार नाहीत.

तर गमंत अशी झाली आहे की, लोकांच्या सुविधेसाठी बसमार्गावर विमानतळाप्रमाणे डिजिटल बोर्ड लावायचं ठरलं, ते काँट्रॅक्ट जा कंपनीला दिलं त्यांना बहुदा मराठी येत नसावं, मग त्यांनी मशीन ट्रान्सलेशन वापरायचं ठरवलं आणि इथेच घोळ झाला. kothrud depot चे ट्रान्सलेशन झालं कोथरूड डेपोत आणि swargate चं स्वर्गात. तसं आमचं स्वारगेट काही स्वर्गाहून कमी नाहीए. 

तर हा फोटो आमच्याकडे व्हॉट्सऍपद्वारे आलेला आहे, तुम्हालाही असं काही फनी मिळालं असेल तर आम्हाला जरूर कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required