बुगाटी शिरोन बाळगणारे एकमेव भारतीय: मयूर श्री!! गुलामी ते अब्जपती हा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास तर जाणून घ्या!

जिद्द ही अशी गोष्ट असते ज्यामुळे माणूस खूप यशस्वी होऊ शकतो किंवा जिद्दीने पेटून उठल्याच्या नादात माणूस दिवाळखोरही होऊ शकतो. या दोन्ही प्रकारच्या माणसांची उदाहरणे आपल्याकडे दिसून येतात. या जिद्दीने एका व्यक्तीला कुठून कुठवर नेले याची कहाणी आज तुम्ही वाचणार आहात.

भारतात श्रीमंत लोकांची कमतरता नाही. पण एकेकाळी भारतातून दक्षिण आफ्रिकेत लोकांना गुलाम म्हणून पाठवले जात असे. तिथे त्यांना नाना प्रकारची कामे करावी लागत असत. या गुलामांच्या पुढच्या पिढ्यांचेही आयुष्य काही फार सुखकर नव्हते. शिक्षण आणि चांगल्या राहणीमानाच्या अभावाने त्यांचेही जगणे खडतर होते.

पण एका गुलाम म्हणून गेलेल्या एका कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाने आपल्या आजोबा आणि वडील आजोबांप्रमाणे आपण हलाखीचे जीवन जगणार नाही ही जिद्द बांधली आणि तो मुलगा आज अब्जावधी रुपयांचा मालक आहे. फिल्मी कहाणीसारखी वाटणारी ही गोष्ट आहे.

मयूर श्री नावाच्या या उद्योगपतीचे आजोबा दक्षिण आफ्रिकेत गुलाम म्हणून पाठवण्यात आले होते. तर त्यांचे वडील एका कत्तलखान्यात कामाला होते. पण मयूर श्री यांनी हळूहळू करत आपला व्यवसाय वाढवला आणि ते आज आफ्रिका आणि अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत झळकत आहेत.

मयूर श्री हे खरंतर बातम्यांमध्ये येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. आज भारतात आधीच श्रीमंत असलेल्या घराण्यांतील उद्योगपती अब्जावधी रुपये कमवत आहेत. पण स्वतःच्या जीवावर उद्योगविश्व उभे करणारे मयूर यांनी २१ कोटी किंमतीची बुगाटी शिरोन ही गाडी खरेदी केली आहे. बातमी ही पण नाही, खरी बातमी ही आहे की ही बुगाटी सुपरकार खरेदी करणारे मयूर हे एकमेव भारतीय आहेत.

बुगाटी कंपनीच्या गाड्या खरेदी करणे भल्या भल्या धुरंदरांना जमत नाही. कारण या गाड्यांची सुरुवातीची किंमत ही १०-१२ कोटी असते. बुगाटी वेरोन ही गाडी अनेकांकडे आहे. तीची किंमत १२ कोटी आहे. पण मयूर यांनी खरेदी केलेली बुगाटी शेरोनने मात्र जगात हवा केली आहे.

बुगाटी शेरोन ही गाडी आजच्या तारखेला जवळपास १०० लोकांकडे असेल. त्या मोजक्या लोकांत मयूर यांचा समावेश झाला आहे. अवघ्या २-३ सेकंदात १०० kmph चा स्पीड घेणारी ही गाडी खासच असेल हे सांगण्याची गरज नाही. तासाला ४२० अशा वादळी वेगाने ती धावते.

मयूर यांची जिद्द होती की हलाखीत दिवस काढलेल्या आपल्या वडिलांना एकदिवस ही सुपरकार गिफ्ट द्यायची. त्यांनी ही जिद्द शेवटी पूर्ण केली आहे. आज मयूर यांच्या वडिलांना आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटत असेल.

मयूर श्री यांचे कुटुंब कोल्ड स्टोरेज बिजनेसमध्ये आहे. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत फळांचा व्यापार होतो. तो मयूर यांच्या कोल्ड स्टोरेजमधून होतो. आज मयूर श्री यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक महाग गाड्या आहेत. रोल्स रॉयस, लंबॉर्गिनी, पोर्शा या लोकांना स्वप्नवत वाटणाऱ्या गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत.

मयूर श्री यांच्यासारख्या लोकांचे यश बघितले तर नाद करावा तो यांनीच हीच भावना मनात येते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required