हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत १० क्रिकेटपटू, पाहा कोण आहे अव्वल स्थानी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. त्यामुळे भारतीय संघात निवड होणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जात असतो. हे खेळाडू केंद्रीय करारात कोट्यवधी रुपयांची कमाई करत असतात. तसेच आयपीएल स्पर्धेतून आणि जाहिरातीतून देखील हे खेळाडू कोट्यवधी रुपये कमवत असतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशा १० भारतीय क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. चला तर पाहूया संपूर्ण यादी.

१) सचिन तेंडुलकर : भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. सर्वोच्च धावा करण्याच्या बाबतीत तो अजूनही सर्वोच्च स्थानी आहे. तसेच सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत देखील मास्टर ब्लास्टर अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकर १११० कोटींचा मालक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याची ब्रँड व्हॅल्यु कमी झाली नाहीये.

) एमएस धोनी : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. धोनीची एकूण संपत्ती ७८५ कोटी रुपये आहे. सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

३)विराट कोहली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत देखील विराट कोहली अव्वल स्थानी आहे. वर्तमान काळात विराट कोहलीची संपत्ती एकूण ७७० कोटी रुपये आहे. येणाऱ्या काळात हा आकडा वाढू शकतो. 

) सौरव गांगुली : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४१६ कोटी रुपये इतकी आहे. 

५) वीरेंद्र सेहवाग : भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. मैदानावर चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी असलेला सेहवाग या पैसे कमावण्याच्या बाबतीतही पुढे आहे.सेहवागची एकूण संपत्ती २८६ कोटी रुपये आहे. तो जाहिरातीतून पैसा कमावतो. तसेच तो समालोचकाची देखील भूमिका पार पाडतो.

६) युवराज सिंग : भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती २५५ कोटी रुपये आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर देखील युवराजची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली नाही. तो जाहिरातीत झळकत असतो तसेच त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. 

७)सुरेश रैना : डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना हा एक अप्रतिम क्रिकेटपटू आहे. त्याने अनेकदा कठीण परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहे. तसेच त्याची एकूण संपत्ती १८५ कोटी रुपये आहे. 

) रोहित शर्मा : भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज आणि तीनही स्वरूपातील कर्णधार रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३ वेळेस दुहेरी शतक झळकावले आहे. वर्तमान काळात रोहित शर्माकडे १६० कोटींची संपत्ती आहे. यासह तो अनेक फॅशन ब्रँड्सला देखील जोडला गेला आहे. 

९)गौतम गंभीर :भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने गेली १३ वर्ष भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले आहे. त्या दरम्यान त्याने तब्बल १७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

१०) राहुल द्रविड : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील तो जाहिरातीत झळकत असतो. त्याची एकूण संपत्ती १७२ कोटी रुपये आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required